Weather Update : विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

मध्य भारतातील कमी दाबाची प्रणाली पश्चिमेकडे सरकल्यानंतर राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. २४) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : मध्य भारतातील कमी दाबाची प्रणाली पश्चिमेकडे सरकल्यानंतर राज्याच्या अनेक भागात पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. आज (ता. २४) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast)आहे. तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Weather Update
Cotton Conference : जळगावात १८ सप्टेंबर रोजी कापूस व्यापार परिषद

पूर्व राजस्थान आणि वायव्य मध्य प्रदेश परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. पाकिस्तानमधील कमी दाब क्षेत्र या प्रणालीत मिसळले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीमध्ये आला आहे. राजस्थानच्या जैसलमेरपासून, कमी दाब प्रणाली, बांदा, पाटणा, बंकूरा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत कायम आहे. पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

Weather Update
Soybean : सोयाबीन आणि युरियाची मात्रा

राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामानासह मुख्यतः पावसाची उघडीप दिली आहे. कोकण, घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. २४) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाच्या उघडीपीसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ होण्याचा अंदाज आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

मंगळवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : दापोली ८०, लांजा, खेड ६०, वाकवली, हर्णे, चिपळूण, पोलादपूर प्रत्येकी ५०, सावंतवाडी, गुहागर, वैभववाडी प्रत्येकी ४०, मंडणगड, संगमेश्वर, देवरूख, राजापूर, माथेरान, महाड, तळा प्रत्येकी ३०.

........

मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर १००, गगनबावडा ७०, शाहूवाडी ५०, इगतपुरी, लोणावळा प्रत्येकी ४०, राधानगरी ३०.

....

विदर्भ : कोर्पणा, गोंदिया, गोंडपिंपरी प्रत्येकी २०.

....

घाटमाथा : दावडी १००, ताम्हिणी, शिरगाव प्रत्येकी ९०. अंबोणे ८०, डुंगरवाडी ७०. कोयना नवजा, कोयना पोफळी प्रत्येकी ५०, खंद ४०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com