Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून, उन्हाचा चटका आणि उकाडाही वाढला आहे. आज (ता. ५) विदर्भ, पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : राज्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने (Rainfall) हजेरी लावली असून, उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाडाही (Heat) वाढला आहे. आज (ता. ५) विदर्भ, पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With lightning) आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमानात वाढ कायम राहून, ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Weather Update
Crop Damage : दीर्घ खंडामुळे पिके करपली

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा भटिंडा, रोहतक, शाजापूरपर्यंत असून, पूर्व टोक हिमालयाच्या पायथ्याकडे सरकले आहे. मध्य प्रदेशपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत कर्नाटक ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोमोरिन परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे सर्वाधिक ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Weather Update
Soybean Rate: खाद्यतेलाची आयात वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न

आज (ता. ५) विदर्भासह मराठवाड्यातील परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाडा वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

विजांसह पावसाचा

इशारा (येलो अलर्ट)

मराठवाडा : परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com