Weather Update : विदर्भ, दक्षिण मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

मॉन्सूनचा आस अद्यापही दक्षिणेकडेच असून, चक्राकार वारे, हवेचा कमी दाबाचा पट्टा पोषक ठरल्याने विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : मॉन्सूनचा आस (Monsoon Axis) अद्यापही दक्षिणेकडेच असून, चक्राकार वारे, हवेचा कमी दाबाचा पट्टा पोषक ठरल्याने विदर्भात पावसाचा जोर (Rain Force) वाढला आहे. आज (ता. २७) विदर्भ, दक्षिण मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Weather Update
Soybean : सोयाबीनच्या पेरणी क्षेत्राने ओलांडला सरासरी क्षेत्राचा टप्पा

ईशान्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फालोदीपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मॉन्सूनचा आस दोन ते तीन दिवसांत उत्तरेकडे जाण्याचे संकेत आहेत. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, किनारपट्टीय आंध्र प्रदेश, रायलसीमा भागांत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

राज्यात सर्वदूर ढगाळ हवामान असून, विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांत पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता. २७) विदर्भ, दक्षिण मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Weather Update
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : अकोला, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली.

विदर्भात पावसाचा जोर

राज्याच्या विविध भागात पावसाचा जोर कमी अधिक होत आहे. मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. अमरावती, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, वाशीम, वर्धा जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातही पावसाने दणका दिला. धर्माबाद येथे सर्वाधिक ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसाने हिमायतनगर शहराला पावसाचा वेढा पडला. नद्या नाल्यांना पूर आल्याने उरली सुरली पिके धोक्यात आली. किनवट तालुक्यातील १० गावांचा संपर्क तुटला. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

राज्यात मंगळवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : पालघर : जव्हार २४. रायगड : माथेरान ६२. ठाणे : शहापूर ४९.

मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर : गगनबावडा २१,पन्हाळा २४. नाशिक : इगतपुरी २२. पुणे : लोणावळा कृषी २४. सातारा : महाबळेश्‍वर २०.

मराठवाडा : लातूर : चाकूर ३७, जळकोट २१, उदगीर ५५. नांदेड : धर्माबाद ८१, हदगाव २०, कंधार २५, किनवट २०, लोहा ३६, माहूर २६, मुखेड २१, नायगाव खैरगाव २१.

विदर्भ : अमरावती : अमरावती २१, चिखलदरा २५, धामणगाव रेल्वे ३०, नांदगाव काझी ३०, तिवसा २१. चंद्रपूर : ब्रह्मपुरी २५, नागभिड २६. गडचिरोली : देसाईगंज वडसा ३०, धानोरा ३३, गडचिरोली ३१, कोरची ४७, कुरखेडा ३३. गोंदिया : आमगाव ३१, गोंदिया ३६, सालकेसा ३२, तिरोडा २९. वर्धा : आर्वी २६, वर्धा ४५. वाशीम : मालेगाव ३६, मंगरूळपीर ४०, मानोरा ४३. यवतमाळ : अर्णी ४२, बाभूळगाव ४१, दिग्रस ५१, महागाव २९, नेर २७, पांढरकवडा २४, यवतमाळ २६.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com