Rain Forecast : राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा अंदाज!

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड या जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणेः राज्याच्या अनेक भागांत पाऊस हजेरी (Rainfall In Maharashtra) लावतोय. शनिवारी राज्यातील काही भागंत जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. तर बहुतेक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट (Orange Alert In Pune District) जारी केला. तर मराठवाड्यातील काही भाग आणि विदर्भात येलो अलर्ट (Rain Yellow Alert In Marathwada) दिला.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगड या जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असून काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी भातशेतीतून वाहत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती गंभीर बनण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये जोरदार सरी पडल्या. तर दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ सुरु होता.

Heavy Rain
Cotton : पेरा वाढूनही कपाशी बियाणे विक्रीला मर्यादा

मध्य महाराष्ट्रातही पाऊस हेजरी लावतोय. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावासाचा जोर अधिक होता. तसंच घाटमाथ्यावर जोरदार सरी बरसत आहेत. अचानक हलक्या सरी येऊन पुन्हा लगेच ऊन पडत आहे. नाशिक जिल्ह्यात अनेक तालुक्यांतील काही मंडळांमध्ये पावासनं हजेरी लावली. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक आहे. तर कुठे काही काळ हलक्या सरी होत आहेत.

Heavy Rain
Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी दोन मंडळाचा अपवाद वगळता सर्वदूर पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही मंडळात पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातही काही मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या सरी पडल्या. तर काही मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला.

विदर्भातही अनेक भागांत पाऊस हजेरी लावतोय. पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण अधिक आहे. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, गोंदीया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये पाऊस पडतोय. मात्र पावसाचं प्रमाण कमी अधिक आहे. तर नंदूरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली. काही मंडळांत जोरदार पाऊस झाला.

हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर मराठवड्यातील उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड तसेच संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com