कुकुडणे जंगलात खैराची तस्करी रोखण्यात वनविभागाला यश

सुरगाणा व पेठ तालुक्यांतील जंगलातून तस्करांनी सागवान लाकूड संपविले आहे. आता दोन ते पाच वर्षांपासून खैर लाकडांच्या तस्करीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
Wood Smuggling
Wood SmugglingAgrowon

सुरगाणा, जि. नाशिक : सुरगाणा व पेठ तालुक्यांतील जंगलातून तस्करांनी (Smuggler) सागवान लाकूड (Teak Wood) संपविले आहे. आता दोन ते पाच वर्षांपासून खैर लाकडांच्या (Khair Wood) तस्करीकडे आपला मोर्चा वळवला आहे. खैर लाकडाची तस्करी करणारे वाहन व खैर लाकूड जप्त करण्यात वनविभागाच्या (Forest Department) पथकास यश आले आहे. मात्र वन तस्कर फरार झाले आहेत.

Wood Smuggling
Indian Agriculture : या तरुणांनो, परत फिरा रे!

उंबरठाण, बाऱ्हे वन परिक्षेत्रातून सातत्याने खैर लाकडाची तस्करी होत आहे. मागील आठवड्यात पिंपळसोंड पैकी उंबरपाडा तातापाणी जंगलातून खैर लाकूड हस्तगत करण्यात आले होते; तसेच वनविभागाने बोरपाडा येथून लाकूड ताब्यात घेतले. या भागातून होत असलेली खैर लाकडाची तस्करी रोखण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर आहे. उंबरठाण वनपरिक्षेत्रातील कुकुडणे वन परिमंडळांतर्गत असलेल्या वनक्षेत्रातून जीजे-१५ झेड-३९८१ या क्रमांकाच्या पिकअप गाडीतून तस्कर खैर लाकडे अवैधरीत्या वाहून नेणार असल्याची गोपनीय माहिती उंबरठाण वनपथकाला मिळाली होती.

Wood Smuggling
Agriculture Technology : फळे -भाज्या राहणार दीर्घकाळ ताज्या

त्यानुसार सुरगाणा व उंबरठाण वनविभागांचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. वेलकर, कैलास नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक अधिकारी हेमंत शेवाळे, वनरक्षक रामजी कुवर, जेजीराम चौरे, गोविंद वाघ, अक्षय पाडवी, हरी चव्हाण, यांच्या पथकाने बुधवारी (ता. ३१) रात्री आठ वाजेच्या सुमारास कुकुडणे जंगलाच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. या वेळी तस्करी करणाऱ्या संशयित यांना वनविभागाच्या आल्याची कुणकूण लागताच खैर तस्करांनी पळून जाण्यासाठी पीकअप वाहन वेगाने घेत असताना वाहन पलटी झाले.

वनाधिकाऱ्यांनी देखील दुसऱ्या वाटेने गुजरातकडे जाणारी चोर वाट गाठली. कुकुडणे रस्त्यावरून जात असताना पथकाने वाहनाद्वारे त्या पिकअपचा पाठलाग करीत असता वाहन पलटी झाल्याचे दिसले. या वेळी तस्करांनी वाहन जागेवरच सोडून देत अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या वेळी वनविभागाच्या पथकाने खैराचे चोवीस नग लाकूड हस्तगत केले. त्याची अंदाजे किंमत पंधरा ते वीस हजार रुपये असल्याचे वनविभागाने सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com