Shivsena : शिवसेनेची गळती थांबेना

ठाण्यातील माजी महापौरांसह ६६ नगरसेवकांनी शिंदे गटाचे समर्थन केले आहे. सेनेत अगदी बोटावर मोजाता येतील इतकेच नगरसेवक राहिले आहेत.
Anand Adsul
Anand AdsulAgrowon

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबत नसल्याचे समोर येत आहे. ठाण्यातील माजी महापौरांसह ६६ नगरसेवकांनी शिंदे गटाचे समर्थन केले आहे. सेनेत अगदी बोटावर मोजाता येतील इतकेच नगरसेवक राहिले आहेत. (Shivsena Latest News)

दरम्यान, ईडीच्या कचाट्यात असलेले माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. अडचणीच्या काळात पक्षाने वाऱ्यावर सोडल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे.

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह ६६ नगरसेवक गुरुवारी (ता.७) शिंदे गटात सहभागी झाले. म्हस्के यांच्यासह नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

नरेश म्हस्के हे ठाण्यातील आक्रमक शिवसेना नेते मानले जातात. त्याच्याकडे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी होती. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा त्यांनी राजीनामा दिल्याने ठाण्यातील सेनेला खिंडार पडण्याची चिन्हे आहेत. ठाण्यात शिवसेनेचे ६७ नगरसेवक आहेत. त्यापैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत.

शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर गळती थांबवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. ते बूथप्रमुखांपासून जिल्हाप्रमुखांपर्यंत सर्वांशी संवाद साधत आहेत. तरीही गळती सुरूच आहे. बुधवारी (ता.६)मागाठाणे विभागातील दोन शाखाप्रमुखांनी पदांचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेच्या शाखा क्रमांक तीनचे प्रमुख प्रकाश पुजारी, शाखा क्रमाक १२ चे शाखाप्रमुख कौस्तुभ महामुणकर यांच्यासह काही महिला आघाडीच्या प्रमुखांनीही राजीनामा दिला आहे.

भावना गवळींना हटविण्यासाठी पत्र

शिवसेनेच्या लोकसभेतील प्रतोद भावना गवळी यांनी उघडपणे एकनाथ शिंदे यांचे समर्थन केल्यानंतर त्यांची प्रदोतपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी राजन विचारे यांची नियुक्त करण्यात आली. भावना गवळी या ‘ईडी’च्या कचाट्यात अडकल्या आहेत. त्या कायदेशीर बाबींमुळे लोकसभेत अनुपस्थित असतात. परिणामी पक्षाच्या कामासाठी त्यांना वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांच्याऐवजी राजन विचारे यांची नियुक्ती केल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com