Fortified Rice : कुपोषण मुक्तीसाठी फोर्टिफाइड राइस

लहान मुले, विद्यार्थ्यांचे कुपोषण दूर व्हावे, थॅलसेमिया, सिकल सेल, ॲनिमिया आजाराचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी केंद्र शासनाकडून मूल्यवर्धित तांदूळ म्हणजेच फोर्टिफाइड तांदळाचे वाटप शाळांतून सुरू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली
Fortified Rice
Fortified RiceAgrowon

कऱ्हाड, जि. सातारा ः लहान मुले, विद्यार्थ्यांचे (Student) कुपोषण दूर व्हावे, थॅलसेमिया, सिकल सेल, ॲनिमिया आजाराचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी केंद्र शासनाकडून मूल्यवर्धित तांदूळ म्हणजेच फोर्टिफाइड तांदळाचे (Fortified Rice) वाटप शाळांतून (Schoolसुरू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Fortified Rice
Farmer Producer Company: शेतकऱ्यांपर्यंत कमी खर्चाचे तंत्र पोहोचवा ः झेंडे

यामध्ये फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बी १२, झिंकसह अन्य पोषक घटकांचा समावेश आहे. या तांदळाच्या आहारातील वापराने सुदृढ आरोग्य मिळेल, अशी धारणा केंद्र सरकारची असून, त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात ॲनिमियामुक्त व आरोग्यदायी भारत अभियान राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाने २०२४ पर्यंत देशातील सर्व जिल्ह्यांना शंभर टक्के फोर्टिफाइड राइस उपलब्ध करून देण्याबाबतची योजना आखली असून, त्यासाठी केंद्राकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच रेशनिंगमधूनही फोर्टिफाइड तांदूळ देण्यात येणार आहे. देशातील तमिळनाडू, तेलंगणा, हरियाना, मध्य प्रदेश या राज्यांनी १०० टक्के गुणसंवर्धित तांदळाचे वितरण चालू केले आहे. थॅलसेमिया, सिकल सेल व ॲनिमिया या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकस आहारातून शरीर सुदृढ बनविणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या सर्व्हेतून समोर आले आहे.

आहारामधील सूक्ष्म पोषकतत्त्वांची कमतरता भरून काढण्याकरिता फोर्टिफाइड तांदूळ देण्यात येत आहे. यात ट्रोन, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बी १२, झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ४९, ३२, बी ५, बी ६ या पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाइड तांदूळ बनवण्यात आला आहे. पोषकतत्त्वे मिळण्याच्या दृष्टीने तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे. फोर्टिफाइड तांदूळ व नियमित तांदूळ याचे प्रमाण एकास १०० असे आहे.

Fortified Rice
Damaged Road : तीन तालुके जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

म्हणजेच पुरवठा करण्यात आलेल्या तांदळामध्ये फोर्टिफाइड तांदळाचे प्रमाण १ किलोमध्ये १० ग्रॅम या प्रमाणात आहे. विद्यार्थ्यांना अधिकची पोषकतत्त्वे मिळण्याच्या दृष्टीने तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे. प्रक्रिया करण्यात आलेल्या फोर्टिफाइड तांदळाचे वजन हे नियमित तांदळापेक्षा कमी असते. त्यामुळे हा तांदूळ पाण्यामध्ये वर तरंगताना दिसतो.

हा तांदूळ पिवळसर रंगाचा दिसत असेल आणि पाण्यामध्ये तांदूळ भिजू घातल्यानंतर त्यापैकी काही तांदूळ पाण्यावर तरंगतात. फोर्टिफाइड तांदूळ नियमित पद्धतीने शिजविण्यात यावा. यासाठी कोणत्याही प्रकारची वेगळी कार्यपद्धती अवलंबवण्याची आवश्यकता नाही, असेही जिल्हा परिषदेकडून शाळांना कळवण्यात आले आहे.

Fortified Rice
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

फोर्टिफाइड राइसमध्ये आयर्न, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन बीसह अन्य मानवी शरीराला आवश्यक पोषक घटक असल्याने लाभार्थांच्या आरोग्याला पोषण मिळण्यास मदत होत आहे. त्यामुळे बालकांतील कुपोषण दूर होण्यास मदत होणार आहे. यापुढे २०२४ पर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून रेशनिंगच्या सर्व लाभार्थांना त्या तांदळाचे वितरण करण्यात येणार आहे.

- पुणितकुमार सिंग,

व्यवस्थापक, भारतीय अन्न विभाग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com