Revenue Department : जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना ‘फोरच्युनर’वाहने

राज्याच्या उत्पन्नात २५ टक्के वाटा महसूल विभागाचा आहे. मात्र महसूल विभागातील महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांनाच चांगल्या दर्जाची वाहने नाहीत.
Department Of Revenue
Department Of RevenueAgrowon

Revenue Department News नगर ः राज्याच्या उत्पन्नात (Income) २५ टक्के वाटा महसूल विभागाचा (Department Of Revenue) आहे. मात्र महसूल विभागातील महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांनाच चांगल्या दर्जाची वाहने नाहीत.

ती मिळावीत, अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर ही मागणी मुख्यमंत्र्यांनीही मान्य केली. त्यामुळे आता जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना फोरच्युनर सारखी अत्याधुनिक वाहणे मिळणार आहेत.

Department Of Revenue
Revenue Department : ‘महसूल’चे सर्व दाखले लवकरच ऑनलाइन ः विखे

लोणी (ता. राहाता) येथे बुधवार (ता. २२) व गुरुवार (ता. २३) अशी दोन दिवस महसूल परिषद झाली. या परिषदेत नवीन वाळू धोरण, आयसरिता २.०, विविध प्रकारच्या दाखल्याचे वितरण, शासकीय जमिनींवरील अतिक्रमण, शर्तभंग, पाणंद रस्ते, शिवार रस्ते, कब्जे पट्ट्याने दिलेल्या जमिनींच्या शर्तभंगाबाबत, अर्धन्यायिक कामकाज अशा विविध विषयांवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन झाले.

Department Of Revenue
Land Revenue : शेतसारा लवकरच ऑनलाइन भरता येणार

दरम्यान, महसूलमधील अधिकाऱ्यांना चांगल्या दर्जाची वाहणे नाहीत, असे स्पष्ट करत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना फॉर्च्यूनर वाहन देण्याची गरज आहे, अशी सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. त्यांच्या सूचनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ हिरवा कंदील दर्शविला.

शासनाचे निर्णय राज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. राज्याच्या उत्पन्नाच्या २५ टक्के महसूल हा या विभागाचा आहे.

महाराजस्व मोहीम, ई-प्रॉपर्टी कार्ड, ४ लाख फेरफार नोंदी ऑनलाइन करणे, ड्रोनद्वारे जमिनीची मोजणी, जिल्ह्याचे नकाशे डिजिटल करणे असे सर्वसामान्यांच्या हिताचे अत्याधुनिक प्रकल्प महसूल विभाग राबवीत आहे.

गावठाण जमाबंदी प्रकल्प देशात प्रथम महाराष्ट्रात राबविला जात आहे. देशात आपल्या महाराष्ट्राचा महसूल विभाग प्रथम क्रमांकावर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com