साडेचार लाख शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. यामुळे बाजार समितीत मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या तब्बल साडेचार लाख होणार आहे.
Voting
VotingAgrowon

यवतमाळ : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांच्या निवडणुकीत (APMC Election) शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क (Farmers Right To Vote) देण्यात आला आहे. यामुळे बाजार समितीत मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या तब्बल साडेचार लाख होणार आहे. जिल्ह्यातील १७ पैकी १५ बाजार समित्यांची निवडणुका (Election) आगामी काळात होऊ घातल्या आहेत.

Voting
निर्यातबंदीविरोधात मध्य प्रदेशातील बाजार समित्या आज बंद

कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकरी तसेच व्यापाऱ्यांच्या मधातील महत्त्वाचा दुवा आहे. शेतकऱ्यांची ही संस्था असली तरी शेतकऱ्यांना यात मतदानाचा अधिकार नव्हता. आता नव्या निर्णयानंतर बाजार समिती निवडणुकीत सातबारा नावे असलेल्या शेतकऱ्यांनाही मतदानाचा अधिकार राहणार आहे. यापूर्वी भाजप-सेना युतीचे सरकार असताना हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सत्तेत येताच हा निर्णय बदलण्यात आला. आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेला खर्च बाजार समितीला करावा लागणार आहे. निवडणुकीचा खर्च लाखोंच्या घरात जाणार आहे. त्यामुळे आधीच डबघाईस आलेल्या अनेक बाजार समित्यांना हा खर्च करावा कुठून, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Voting
कोणत्या राज्यात किती टक्के मतदान ?

निवडणुकीसाठी निधी न जमविल्यास बाजार समिती अशासकीय मंडळ किंवा प्रशासक राहण्याची दाट शक्यता आहे. सद्यःस्थितीत निवडणुका स्थगित आहेत. परिणामी, निवडणुकीसाठी बराच अवधी शिल्लक आहे. जिल्ह्यात १७ बाजार समित्या असून, यातील १५ बाजार समित्यांचा निवडणुकीचा ‘डिव्ह’ राहणार आहे. दारव्हा, बोरी अरब, पुसद, वणी या बाजार समित्यांवर प्रशासक आहेत. येत्या काही महिन्यात आर्णी, कळंब, यवतमाळ बाजार समितीच्या संचालक मंडळांची मुदत संपणार आहे. २०३२ मध्ये उमरखेड, तर २०२४ मध्ये पांढरकवडा बाजार समितीची मुदत संपणार आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या बाजार समिती निवडणुकीत शेतकरी मतदान करताना दिसणार आहेत.

राळेगाव बाजार समितीवर प्रशासक

अनेक बाजार समित्यांची मुदत संपली आहे. राळेगाव बाजार समितीची मुदत मंगळवारी (ता. २६) संपुष्टात येणार आहे. यानंतर या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे. पावसामुळे सध्या अनेक निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

तालुका-शेतकरी संख्या

यवतमाळ-२३३६४

बाभूळगाव-२१६३२

दारव्हा-३८२८१

दिग्रस-१९६४१

आर्णी-३१८०८

नेर-२७३६६

पुसद-४१६११

उमरखेड-३९८४०

वणी-३३१४४

मारेगाव-१९००९

झरीजामणी-१४९४०

केळापुर-२२१६२

घाटंजी-२५०९१

राळेगाव-२७०३१

कळंब-२१६७३

महागाव-३५९४८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com