Electricity : चार मुलांच्या मृत्यूप्रकरणी कठोर कारवाई करा

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडीच्या येठेवाडी परिसरात झालेल्या दुर्घटनेत वीजवाहक तारेच्या धक्क्याने चार मुलांचा मृत्यू झाला.
Electricity
ElectricityAgrowon

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागातील खंदरमाळवाडीच्या येठेवाडी परिसरात झालेल्या दुर्घटनेत वीजवाहक (MSEB) तारेच्या धक्क्याने चार मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रविवारी (ता.९) सकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (RadhaKrushna Vikhe Patil) यांनी गावात जाऊन बर्डे कुटुंबीयांचे सांत्वन करीत त्यांना दिलासा दिला.

Electricity
Lumpy Vaccination : पशुधन विमा योजना तीन वर्षांपासून बंद

या प्रकरणी वीजवितरण कंपनीचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याने, जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश विखे यांनी दिले. वीज वितरण कंपनी, मुख्यमंत्री सहायता निधी आणि स्व. गोपीनाथ मुंढे अपघात विमा योजनेतून प्रत्येक कुटुंबीयांना ११ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Electricity
Lumpy Skin : लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव बुलडाण्यात कायम

शनिवारी (ता. ८) रोजी तालुक्यातील येठेवाडी परिसरातील वांदरकडा येथे तुटलेल्या वीजवाहक तारेमधील विजेच्या धक्क्याने आदिवासी कुटुंबातील चार मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाल्याशिवाय अंत्यविधी न करण्याचा निर्णय त्या कुटुंबासह ग्रामस्थांनी घेतला होता.

Electricity
Lumpy Vaccination : शेळ्यांची ‘गोट पॉक्स’ लस ‘लम्पी’वर ठरतेय प्रभावी

महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी केल्यानंतर शोकाकूल वातावरणात चारही मुलांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. या भागातील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या प्रलंबित समस्या जाणून घेताना,

या भागातील सर्व आदिवासी कुटुंबांच्या घरकुलाचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या.‘विशेष मोहीम हाती घ्या’वादळीवाऱ्यासह पावसाने नुकसान झालेल्या वीज वितरण कंपनीच्या वीजवाहक तारा तातडीने पुर्ववत करण्यासाठी, वीज वितरण कंपनीने जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com