ब्रिटनमध्ये पाचऐवजी चार दिवस कामकाज

पथदर्शी योजनेबद्दल कंपन्यांचा अभिप्राय
Four days of work in the UK instead of five
Four days of work in the UK instead of fiveAgrowon

लंडन (वृत्तसंस्था) ः चार दिवसांचा कामकाजाचा आठवडा... चांगला आहे,’ अशी प्रतिक्रिया ब्रिटनमधील कंपन्यांनी दिली आहे. येथील ‘फोर डे विक ग्लेबल’ या समाजसेवी संस्थेने ‘चार दिवस काम’ ही पथदर्शी योजना राबविली आहे. त्यात भाग घेतलेल्या कंपन्यांमधून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Four days of work in the UK instead of five
Cotton Rate : कापूस दरवाढ रोखण्याचा दबाव केंद्राने झुगारला

यासंबंधीचा सर्व्हे मंगळवारी (ता. २०) जाहीर झाला. या योजनेनुसार चार दिवस कामासाठी वेळापत्रक आखलेल्या ब्रिटनमधील ७० कंपन्यांपैकी ७८ टक्के कंपन्यांनी या व्यवस्थेत चांगले किंवा सुरळीत काम होत असल्याचा अभिप्राय दिला आहे. केवळ दोन टक्के कंपन्यांनी अशा पद्धतीने काम करणे हे आव्हानात्मक असल्याचे सांगितले. पण बहुतेक (८८ टक्के) कंपन्यांच्या मते आठवड्यातून चार दिवस व्यवस्थित काम होत आहे. चार दिवसांचा कामाचा आठवडा ही काही गंमतीची गोष्ट नाही. कॅलिफोर्नियाच्या खासदारांनीही राज्यात काही कर्मचाऱ्यांसाठी ही योजना राबविण्यावर विचारमंथन केले होते, पण नंतर ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आणि त्यांना कंपनीत काम करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कमी दिवसांचा आठवडा ही योजना उत्तम योजना असल्याचे अमेरिकेतील ‘ग्रार्टमनर’ या तंत्रज्ञानविषयक संशोधन आणि सल्लागार कंपनीने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.

Four days of work in the UK instead of five
Soybean Rate : सोयाबीन दर पुन्हा सावरले

सर्वेक्षणातील निष्कर्ष
- पथदर्शी योजनेचा कालावधी नोव्हेंबरमध्ये संपल्यानंतरही ही योजना पुढे सुरू ठेवणार असल्याचे ब्रिटनमधील सहभागी कंपन्यांपैकी ८६ टक्के आस्थापनांचा विचार
- कर्मचाऱ्यांची उत्पादकता सुधारल्याचे ४९ टक्के कंपन्यांना सांगितले
- उत्पादकता स्थिर राहिल्याचे ४६ टक्के कंपन्यांना वाटते
- पाच दिवसांच्या नियमित वेळेतील काम चार दिवसांत करण्याचे आव्हान

‘‘कर्मचाऱ्यांच्या वार्षिक रजेच्या काळात या योजनेनुसार काम करणे कठीण होणार आहे. पण कर्मचारी खूष आहेत. जेथे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे व जेथे पाच किंवा सात दिवस काम करण्याची गरज आहे, तेथे ही योजना राबविण्यास अडचणी येऊ शकतात. अशा ठिकाणी बारकाईने नियोजन करावे लागेल.’’
निस्सी रसेल, व्यवस्थापकीय संचालक, वॉटरवाईज

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com