Urea for Nanded: नांदेडसाठी चार हजार टन युरिया प्राप्त : डॉ. चिमणशेट्टे

नांदेड जिल्ह्यास युरिया खत आवश्यकतेनुसार उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी डाळवर्गीय हरभरा पिकात युरिया खताचा वापर टाळावा. जेणेकरून, पिकाची अनावश्यक वाढ होणार नाही.
Urea for Nanded news
Urea for Nanded newsAgrowon

नांदेड : जिल्ह्यास जानेवारी महिन्यात युरिया खताची मागणी (Urea Fertilizer Demand) वाढत आहे. जिल्ह्यात १५ हजार टन युरिया खताचे पुरवठा (Urea Supply) नियोजन प्राप्त झाले आहे. त्यानुसार दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या अनुक्रमे १८०० टन व २२०० टनाच्या रॅक प्राप्त झाल्या आहेत.

त्या दोन दिवसांत जिल्ह्यात वितरित होतील. शेतकऱ्यांनी पिकाच्या गरजेनुसार व कृषी विद्यापीठ शिफारस मात्रेनुसारच युरिया खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमणशेट्टे यांनी केले.

Urea for Nanded news
Nano Urea : सेंद्रिय समकक्ष तंत्रज्ञान हवे नादीर गोदरेज यांची अपेक्षा

नांदेड जिल्ह्यास युरिया खत आवश्यकतेनुसार उपलब्ध होईल. शेतकऱ्यांनी डाळवर्गीय हरभरा पिकात युरिया खताचा वापर टाळावा. जेणेकरून, पिकाची अनावश्यक वाढ होणार नाही. खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होईल.

Urea for Nanded news
Urea Shortage : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्‍यांना मिळेना युरिया

अमोनिअम सल्फेट ज्यामध्ये नत्र २०.६ सल्फर २३ टक्के असणाऱ्या खताचा युरिया खतास पर्याय म्हणून वापर केल्यास पिकास हळूहळू अमोनिअम सल्फेटमधील नत्र उपलब्ध होईल.

पिकास सल्फरची कमतरता भासणार नाही. तसेच जिल्ह्यात नॅनो युरिया उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापर केल्यास पिकांना त्वरित नत्र उपलब्ध होईल.

जाड युरियाला शेतकऱ्‍यांची नापसंती

जिल्ह्यात प्राप्त झालेला अधिकांश युरिया नियमित युरियापेक्षा थोडा जाड आहे. परंतु शेतकरी मात्र लहान आकाराच्या युरियाला पसंती देत आहेत.

या दोन्ही प्रकारच्या युरियात नत्राचे प्रमाण ४६ टक्के असते. यामुळे शेतकऱ्यांनी युरिया घेताना ठरावीक कंपनीच्या युरियाची मागणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com