Solar Agricultural Pumps : सौर कृषिपंप देण्याच्या नावाखाली फसवणूक

शेवगावातील शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
 Solar pump
Solar pumpAgrowon



नगर ः सरकारी योजनेतून सौर कृषिपंप (solar agricultural pumps)मिळवून देण्याच्या नावाखाली राहुरी येथील एका एजन्सीने पावत्या फाडून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. अशी तक्रार शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे मेलद्वारे केली आहे. या बाबत चौकशी करून पैसे वसुल करणाऱ्या कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आमच्यासह हजारो शेतकऱ्यांकडून अशाप्रकारे पैसे वसुल केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी झाल्यास मोठा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे.

 Solar pump
Solar Pump : सौर पंपांसाठी १५ कोटी २७ लाख रुपयांना मंजुरी

शेतकऱ्यांना सहज वीज उपलब्ध व्हावी, वीज खर्चात बचत व्हावी, यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री सौरपंप योजनेतून लाभ दिला जातो. साधारपणे अल्पभूधारक शेतकऱ्यांना तीन एचपी, बहु भू-धारकसाठी पाच व साडेसात एचपी सौर कृषिपंपाचा लाभ दिला जातो. त्यासाठी सर्वसाधारण लाभार्थ्याचा दहा टक्के हिस्सा असतो. त्यानुसार अनुक्रमे १९ हजार, २७ हजार व ३६ हजार रुपये हिस्सा भरावा लागतो. पूर्वी केंद्र सरकारची अटल सौरपंप योजना होती. त्या धर्तीवर भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना आली. दोन वर्षांपासून या योजनेचे नाव ‘कुसुम’ केले आहे. ‘महावितरण’ऐवजी शासनाने पुरस्कृत केलेल्या सरकारच्या एका कंपनीकडे ही योजना दिली आहे.

सौर कृषिपंपाचा लाभ मिळावा, यासाठी अनेक शेतकरी प्रयत्न करतात. परंतु त्यांना लाभ मिळत नाही. अशाच शेतकऱ्यांचा फायदा घेऊन राहुरी (जि. नगर) येथील एका कंपनीने सौर कृषिपंप मिळवून देण्याचे आमिष दाखवत तीन वर्षांपूर्वी शेवगाव तालुक्यासह अन्य भागांतील शेतकऱ्यांकडून एक हजार रुपयांपासून ते नऊ हजारापर्यंत पैसे घेऊन लाखो रुपये उकळले. मात्र त्या शेतकऱ्यांना तीन वर्षानंतरही सौरपंप मिळाला नाही. त्यामुळे आता त्या शेतकऱ्यांनी आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

 Solar pump
Solar Pump : शेतकऱ्यांना तत्काळ सौर कृषिपंप द्यावेत

तक्रारीनुसार, दोन वर्षांपूर्वी सौरपंप मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. दरम्यान राहुरीमधील एका कंपनीच्या लोकांनी आमच्यासह शेवगाव तालुका व अन्य भागांतील शेतकऱ्यांशी संपर्क करून ‘सौरपंप मिळवून देतो. ऊर्जा खात्याच्या मंत्र्याशी आमचे थेट सबंध आहेत. आम्ही कृषिपंप बसवून देण्याचे विविध कंपन्यांचे काम करतो,’’ असे त्यांनी सांगितले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या लोकांनी पैसे घेतले व पावत्या दिल्या. मात्र आता दोन वर्षे झाले तरी सौरपंपाचा लाभ दिला नाही. त्यामुळे आमची फसवणूक झाली आहे. त्यामुळे त्याची चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आता प्रशासन, शासन काय भूमिका घेतेय? याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान संबंधित कंपनीशी संपर्क केला असता प्रतिक्रिया मिळाली नाही.


सरकारी योजनेतून सौर कृषिपंप मिळवून देणार असल्याचे सांगून माझ्याकडून ४ हजार रुपये रोख घेऊन ५ हजार रुपये बाकी असल्याचे दाखविणाऱ्या पावत्या दिल्या. दोन वर्ष झाली, मात्र आम्हाला अजूनही सौरपंपाचा लाभ मिळत नाही. संबंधित कंपनीने माझ्यासह अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्या बाबत तक्रार दिली आहे. त्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी.
- अशोक तहकीक, शेतकरी, लाड जळगाव, ता. शेवगाव, जि. नगर.


‘‘कृषी सौरपंपांचा लाभ घेण्यासाठी कोणालाही आगावू रक्कम देण्याची गरज नाही. एससी, एसटी प्रवर्गातील लाभाथ्यांना पाच टक्के व सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना दहा टक्के लोकवाट्या व्यतिरिक्त अधिकचा एक रुपयाही लागत नाही. कोणतीही खासगी संस्था त्यासाठी नियुक्त नाही. त्यामुळे अशा तक्रारी असतील तर आमच्याशी संपर्क करावा. ’’
- विनोद शिरसाट, व्यवस्थापकीय संचालक, मेडा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com