Fertilizer Linking : खतांसह गाडीभाडे लिंकिंगचा नवा प्रकार

शेतकऱ्यांना पेरणीनंतर रासायनिक खतांची गरज भासते. शेतकऱ्यांना पिकांसाठी खत अत्यावश्यक आहे. त्यामुळे लाखो टन खतांची मागणी केली जाते.
Fertilizer
FertilizerAgrowon

यवतमाळ : शेतकऱ्यांना पेरणीनंतर रासायनिक खतांची (Chemical Fertilizer) गरज भासते. शेतकऱ्यांना पिकांसाठी खत (Fertilizer) अत्यावश्यक आहे. त्यामुळे लाखो टन खतांची मागणी (Fertilizer Demand) केली जाते. जिल्ह्यात जानेवारीपासून खतांची आवक सुरू झाली आहे.

Fertilizer
Fertilizer Brickets : पिकांना खते द्या ब्रिकेट्स स्वरुपात

यंदा खतांसोबत इतर खतांचे लिंकिंग केले गेले. अजूनही लिंकिंगचा प्रकार थांबलेला नाही. आता नवीन शक्कल लढवीत कृषी विक्रेत्यांकडून गाडीभाडे हा नवाप्रकार समोर आला आहे. याशिवाय, काही खतांचेही लिंकिंग सुरू आहे.

Fertilizer
Fertilizer Stock : रब्बीसाठी देशात पुरेशी खते उपलब्ध

यंदा मोठ्या प्रमाणात कंपन्यांकडून लिंकिंग होत असल्याने त्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांवर पडत आहे. नॅनो यूरियासोबतही लिंकिंग सुरू असल्याची माहिती आहे. मध्यंतरी कृषी विक्रेत्यांनी लिंकिंग विरोधात आवाज उठविला होता. त्या वेळी शासनाने लिंकिंगवर निर्बंध आणण्याचे सूतोवाच केले होते. प्रत्यक्षात काहीही झालेले नाही.

उलट हंगाम जवळ येताच लिंकिंग वाढली आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला दोन लाख रुपये किमतीच्या खतांवर ५० हजार रुपयांचे खत लिंकिंग करून विकले गेले. हाच माल शेतकऱ्यांच्या माथी मारला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त भुर्दंड पडला. यानंतरही लिंकिंग कमी झालेली नाही. रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना लिंकिंगचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

खरिपानंतर आता रब्बीची पेरणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना आगामी दिवसांत खतांची गरज पडणार आहे. सध्या खत मुबलक असले तरीही लिंकिंग कमी झालेली नाही. लिंकिंगचा नवा प्रकारही आता समोर येत आहे. काही कंपन्यांकडून कृषी विक्रेत्यांनी खत न घेतल्यास गाडीभाडे मागण्याचा प्रकार सुरू आहे.

याशिवाय मागणी असलेल्या युरिया व विशिष्ट वाणासोबतही सर्रासपणे लिंकिंग केली जात आहे. अतिवृष्टीने आधीच शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच आता हा लिंकिंगचा प्रकार सुरू असल्याने शेतकरी आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

युरियासह १०:२६:२६ ला मागणी

बाजारात सद्यःस्थितीत युरिया व १०:२६:२६ या खतांच्या मागणीत वाढ झालेली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडला होता. ज्या खतांना मागणी नसते, अशी खते जादा मागणी असलेल्या खतांसोबतच घेण्याची अट घातली गेली. युरिया, डीएपी यांसह अनेक खतांची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. त्याच खतांसोबत इतर खतं लिंकिंग करून विकला गेला. अजूनही तसाच प्रकार सुरू असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com