Lumpy Vaccination : पशुवैद्यक विद्याथ्यांकडून २८ हजार पशुधनाचे लसीकरण

परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या पदव्युत्तर आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी शुक्रवार (ता. २३)पर्यंत सहा जिल्ह्यांतील ५४ गावांतील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन २८ हजारांवर पशुधनाचे ‘लम्पी स्कीन’ प्रतिबंधक लसीकरण केले.
Lumpy Vaccination
Lumpy VaccinationAgrowon

परभणी ः महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठांतर्गत परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाच्या पदव्युत्तर आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी (Parbhani Agricultural Student) शुक्रवार (ता. २३)पर्यंत सहा जिल्ह्यांतील ५४ गावांतील शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन २८ हजारांवर पशुधनाचे ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) प्रतिबंधक लसीकरण (Lumpy Vaccination)केले, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. मीरा साखरे (Dr. Meera Sakhre ) यांनी यांनी दिली.

Lumpy Vaccination
Lumpy Vaccine : ‘लम्पी स्कीन’वरील लसीकरणासाठी ३१० खासगी सेवादात्यांची सेवा

पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयातर्फे लम्पी स्कीन आजाराबाबत शेतकरी आणि पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. गोरजकट्टा या उपक्रमाव्दारे ऑनलाइन पद्धतीने माहिती आणि सल्ला दिला जात आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, पुणे जिल्ह्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी २ समन्वयक आणि २० पदव्युत्तर आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे चमू पाठविण्यात आले आहेत.

Lumpy Vaccination
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ प्रतिबंधासाठी लसीकरणावर भर

या मोहिमेत ४० पदव्युत्तर विद्यार्थी, ७० प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, ४८ प्राध्यापक सहभागी झाले आहेत. सोमवार (ता. १२)पासून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने, प्रत्येक जिल्ह्यासाठी नियुक्त समन्वयक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा चमू शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पशुधनाचे लसीकरण करत आहे

Lumpy Vaccination
Sunday Farmer : अनुभवातून शिकतोय शेती...

महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विवेक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक प्रा. डॉ. एम. बी. ए. सिद्दिकी, डॉ. एन. डी. जाधव, डॉ. एम. जी. निकम, डॉ. एम. एफ. सिद्दीकी, डॉ. पी. आर. राठोड, डॉ. विनायक इंगळे, डॉ. तौहिद शफी, डॉ. आलोक इंगळे, डॉ. पी. एम. केकाण, डॉ. व्ही. के. मुंडे हे काम पाहत आहेत. लम्पी स्कीन आजार लक्षणे, प्रतिबंधक उपाय याविषयीची शास्त्रोक्त माहिती घडीपत्रिका प्रा. डॉ. मीना साखरे, डॉ. धनंजय देशमुख, डॉ. सुनीत वानखेडे यांनी प्रकाशित केली आहे.

आगामी काळामध्ये, पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्यातर्फे लम्पी स्कीन आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने चर्चासत्रे, परिसंवादांचे आयोजन करण्यात केले जाईल, असे डॉ. साखरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com