
माळीनगर, जि. सोलापूर ः सोलापूर विभागातील ४८ साखर कारखान्यांकडून यंदाच्या हंगामातील ३१ डिसेंबरपर्यंतचे ‘एफआरपी’चे (FRP) १५७४.१४ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. मात्र, चालू हंगामातील आणखी ५७७.८१ कोटी रुपये कारखान्यांकडे थकीत आहेत.
यंदा सोलापूर जिल्ह्यातील ३५ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ अशा एकूण ४८ कारखान्यांनी विभागात गाळप हंगाम घेतला आहे.
सोलापुरातील ३५ कारखान्यांनी एफआरपीचे १२४५.९८ कोटी तर उस्मानाबादमधील १३ कारखान्यांनी ३२८.१६ कोटी रुपये डिसेंबरअखेर दिले आहेत. तरीही सोलापूर जिल्ह्यातील २७ कारखान्यांकडे एफआरपीचे ५०६.६६ कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १० कारखान्यांकडे ७१.१५ कोटी रुपये थकीत आहेत.
लोकनेते, ओंकार, गोकूळ शुगर्स धोत्री या कारखान्यांनी १५ डिसेंबरपर्यंतचा एफआरपी अहवाल सोलापूर साखर सहसंचालकांकडे सादर केलेला नाही.
अनेक कारखान्यांनी ५० टक्के पेक्षाही कमी एफआरपी दिली आहे. मकाई ४१ टक्के, सिद्धनाथ ४४ टक्के, इंद्रेश्वर २७ टक्के, भैरवनाथ (विहाळ) ३६ टक्के, विठ्ठल रिफाइंड १८ टक्के, सहकार शिरोमणी व धाराशिव (सांगोला) यांनी प्रत्येकी २९ टक्केच एफआरपी दिली आहे.
यंदा एफआरपीबाबत कारखाने गेल्यावर्षीचेच धोरण राबवीत अाहेत. हंगाम पुढे जाईल, तसतशी थकीत एफआरपी वाढतच जाईल. त्यामुळे साखर आयुक्तालयाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
कारखानानिहाय ३१ डिसेंबरअखेर
थकीत एफआरपी (कोटी रुपयांत) ः
सोलापूर जिल्हा ः सिद्धेश्वर-२९.५५,संत दामाजी-१२.८३,सहकार महर्षी-६.३१,मकाई-८.०६,संत कुर्मदास-७.०३,सासवड माळी-१२.०४,लोकमंगल (बीबीदारफळ)-११.२९,लोकमंगल (भंडारकवठे)-३३.१८,सिद्धनाथ-३८.५५,जकराया-१३.७९,इंद्रेश्वर-२३.४३,भैरवनाथ (
विहाळ)-२४.६२,भैरवनाथ (लवंगी)-१९.१४,युटोपियन-१७.८२,मातोश्री शुगर-४.५५,भैरवनाथ (आलेगाव)-१९.४३,जयहिंद-२३.७३,विठ्ठल रिफाइंड-४१.६२,आष्टी शुगर-१२.२९,भीमा-१७.०६,सहकार शिरोमणी-२४.१५,सीताराम महाराज-१.४९,धाराशिव (
सांगोला)-१६.८६,श्री शंकर-१२.८८ (१९.२५),विठ्ठल (गुरसाळे)-१४.९७
उस्मानाबाद जिल्हा : विठ्ठलसाई-५.१०,डॉ बाबासाहेब आंबेडकर-०.०२,भैरवनाथ (वाशी)-१.८६,भीमाशंकर-१.८३, धाराशिव-१०.१३,भैरवनाथ (सोनारी)-१७.३८,लोकमंगल माऊली-१६.९३,क्यूनर्जी-६.४४,आयान मल्टिट्रेड-६.६५,डीडीएनएसएफए-४.८१
-
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.