VNMKV, Parbhani : ‘वनामकृवि’त फळे, मसाले प्रक्रिया तंत्रज्ञ कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयामध्ये स्क्वॅश आणि ज्यूस प्रक्रिया तंत्रज्ञ २६० तास, मसाले प्रक्रिया तंत्रज्ञ ५२० तास आणि फ्रूट पल्प प्रक्रिया तंत्रज्ञ ३२० तास अभ्यासक्रम (कोर्सेस) सुरू करण्यात येत असून याकरिता नावनोंदणी चालू आहे.
VNMKV
VNMKVAgrowon

परभणी ः परभणी जिल्ह्यातील ग्रामीण युवकांकरीता महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत किमान कौशल्य विकास कार्यक्रम २०२२-२३ (सर्वसाधारण जिल्हास्तरीय योजना) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयामध्ये स्क्वॅश आणि ज्यूस प्रक्रिया तंत्रज्ञ २६० तास, मसाले प्रक्रिया तंत्रज्ञ ५२० तास आणि फ्रूट पल्प प्रक्रिया तंत्रज्ञ ३२० तास अभ्यासक्रम (कोर्सेस) सुरू करण्यात येत असून याकरिता नावनोंदणी चालू आहे. याकरिता स्क्वॅश आणि ज्यूस प्रक्रिया तंत्रज्ञ या कोर्ससाठी किमान आठवी पास आणि स्क्वॅश आणि ज्यूस प्रक्रियेचा २ ते ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्‍यक आहे. मसाले प्रक्रिया तंत्रज्ञ अभ्यासक्रमाकरिता किमान दहावी पास व ० ते १ वर्षाचा मसाले प्रक्रिया उद्योगाचा अनुभव असणे आवश्‍यक आहे आणि फ्रूट पल्प प्रक्रिया तंत्रज्ञ या कोर्ससाठी किमान आठवी पास व २ ते ३ वर्षाचा अन्न प्रक्रिया उद्योगाचा अनुभव असणे आवश्‍यक आहे.

सदरील कोर्सेससाठी परभणी जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील ग्रामीण युवक पात्र आहेत. अधिक माहितीकरिता सहायक आयुक्त प्रशांत खंदारे (९४२०७८८७४७), दिक्षीत (९८९०८२८७९७) कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र किंवा अन्नतंत्र महाविद्यालय, वनामकृवि, परभणी येथील सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. आर. बी. क्षीरसागर (९८३४९०५५८०), प्रा. ए. ए. जोशी (९६३७२४०४०६) आणि डॉ. एस. के. सदावर्ते (९८८१७७१३८४) यांच्याशी संपर्क साधावा. मधुमक्षिका पालन उद्योग कौशल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम परभणी

परभणी जिल्ह्यातील ग्रामीण युवकांकरीता महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत किमान कौशल्य विकास कार्यक्रम २०२२-२३ (सर्वसाधारण जिल्हास्तरीय योजना) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्र विभागात तीन महिन्याचा (१८० तास) मधुमक्षिका पालन उद्योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम (कोर्स) सुरू करण्यात येत असून याकरिता नावनोंदणी चालू आहे. याकरिता पाचवी पास आणि ३ वर्षाचा शेती, शेतीपूरक व्यवसायाचा अनुभव किंवा आठवी पास आणि १ वर्षाचा शेती, शेतीपूरक व्यवसायाचा अनुभव असलेले परभणी जिल्ह्यातील १८ ते ४५ वयोगटातील ग्रामीण युवक पात्र आहेत. अधिक माहितीकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रशांत खंदारे (९४२०७८८७४७), दिक्षीत (९८९०८२८७९७) किंवा कृषी कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. एम. एम. सोनकांबळे (९४२३४३८०३१), अनुराग खंदारे (९९३००५०९१४) यांच्याशी संपर्क साधावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com