शेतीमाल साठवणुकीत गोदामात मारताहेत काटा

राज्यात ‘महाएफपीसी’द्वारे अनेक शेतकरी कंपन्यांना नाफेडसाठी धान्य खरेदीची परवानगी मिळाली आहे. अंजनगावसूर्जी (अमरावती) तालुक्‍यातील चिंचोली येथील एकवीरा शेतकरी उत्पादन कंपनीचाही त्यामध्ये समावेश आहे.
शेतीमाल साठवणुकीत गोदामात मारताहेत काटा

अमरावती ः पणन मंडळाच्या गोदामात (Warehouse) साठवण्यासाठी आणलेल्या शेतीमालाची (Agriculture Produce) पूर्ण नोंदच घेण्यात आली नाही. परिणामी, या माध्यमातून अपहार (Scam) झाल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे तब्बल पावणेदोन लाख रुपयांचा अधिक शेतीमाल (Agriculture Commodity) घेतल्याचा दावा शेतकरी कंपनीने केला आहे. कंपनीने माहिती अधिकारान्वये या संदर्भातील नियम, अटींची मागणी केली. परिणामी, प्रशासकीय यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

शेतीमाल साठवणुकीत गोदामात मारताहेत काटा
Wheat : सरकार खुल्या बाजारात गहू विकणार नाही

राज्यात ‘महाएफपीसी’द्वारे अनेक शेतकरी कंपन्यांना नाफेडसाठी धान्य खरेदीची परवानगी मिळाली आहे. अंजनगावसूर्जी (अमरावती) तालुक्‍यातील चिंचोली येथील एकवीरा शेतकरी उत्पादन कंपनीचाही त्यामध्ये समावेश आहे. गेल्या हंगामात तुरीला खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळाला; परिणामी हमी केंद्राकडे या वर्षी तूर आली नाही. परंतु रब्बी हंगामातील हरभरा खरेदी मात्र जोरात झाली. ‘एकवीरा’द्वारे १६ हजार क्‍विंटल धान्य खरेदी करण्यात आले. साठवणुकीसाठी हा शेतीमाल अचलपूर येथील शासकीय गोदामात नेण्यात आला. १५ टन मालाची गाडी पाठविल्यास ३० ते ४० किलो घट दाखवीत त्यानुसार नोंद घेण्यात आली.

शेतीमाल साठवणुकीत गोदामात मारताहेत काटा
‘अन्न, नागरी’च्या ४० कोटींच्या गोदाम बांधकामांना स्थगिती

३० ते ४० किलो घट उंदरांनी पोते कुरतडत व इतर कारणांमुळे गाडी भरतेवेळी होते. हा सांडलेला शेतमाल दुसऱ्या गाडीत भरून १५ टन अधिक ४० किलो याप्रमाणे पाठविला जातो. परंतु या अधिक ४० किलो शेतीमालाची नोंदच गोदाम पावतीवर पणन मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली नसल्याचा दावा शेतकरी कंपनीने केला आहे. अशाप्रकारे १६ हजार टन शेतमाल साठवणूक करताना २६ क्‍विंटल धान्य कमी दाखविण्यात आले. त्याची किंमत पावणेदोन लाख रुपयांच्या घरात आहे.

प्रकरण विभागीय पणन अधिकाऱ्यांकडे

कंपनीच्या संचालक मंडळाने या प्रकरणी अखेरीस ऑनलाइन माहिती अधिकारान्वये माहिती मागविण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण आता विभागीय पणन अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यांच्याकडून कायद्यातील तरतुदीसंदर्भात काय माहिती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.

काटा पावतीवर नमूद संपूर्ण शेतीमालाची नोंद गोदाम पावतीवर घेतली जाते. त्यात घट घेण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. परंतु त्यानंतरही नेमक्‍या प्रकरणाची माहिती संबंधितांकडून घेतली जाईल. त्यानंतरच या संदर्भात बोलणे योग्य ठरेल.
अजित मसाळ, विभागीय व्यवस्थापक, पणन मंडळ, अमरावती

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com