Abdul Sattar : कृषी विद्यापीठांचे कार्य शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे

राज्यातील कृषी विद्यापीठांचे कार्य हे शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे असून विद्यापीठांनी आपले संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

अकोला ः राज्यातील कृषी विद्यापीठांचे कार्य हे शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे असून विद्यापीठांनी आपले संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. सर्व अधिकारी, संशोधक व प्राध्यापकांनीही ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Abdul Sattar
Soybean Pest : सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शुक्रवारी (ता. २) सत्तार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीस कुलगुरू डॉ. विलास भाले, विधान परिषद सदस्य आमदार विप्लव बाजोरिया, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह, जिल्हा कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे तसेच अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Abdul Sattar
Cotton Production : अमेरिकेतील कापूस उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार?

कृषिमंत्री सत्तार यांच्यासमोर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची सविस्तर माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले. मंत्री सत्तार म्हणाले, की विद्यापीठाने विविध पिकांचे संशोधन करताना मागणीप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करावे. संशोधन शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर असणे आवश्यक आहे. चांगल्या वाणांना चालना द्यावी. सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने अधिकाधिक शेतकऱ्यांनी सेंद्रिय उत्पादनांकडे वळावे यासाठी चालना द्यावी. संशोधन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. लोकांना अधिक शक्तिदायक अन्न उपलब्ध करून देणाऱ्या पिकांच्या जाती संशोधित कराव्यात.

आदिवासी क्षेत्रातील दुर्लभ पिकांच्या जातींचा विकास करावा. आदिवासी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आदिवासी क्षेत्रातच व्यवस्था करावी. शेतीच्या सिंचनासाठी जलस्रोतांचे बळकटीकरण करावे. विद्यापीठाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी पदभरतीला प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी आवश्यकतेच्या प्राधान्यक्रमानुसार पदभरती करण्याबाबत शासन पावले उचलेल, असेही सत्तार यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या कुलगुरूपदाच्या कारकिर्दीचा अखेरचा दिवस असल्याने त्यांचा सत्कारही कृषिमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी कृषिमंत्र्यांनी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध वाण व उत्पादनांच्या प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com