Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांकडून निधी तीन मिनिटांत मंजूर

नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय नूतन इमारतीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
Eknath Shinde
Eknath ShindeAgrowon

नंदुरबार : नंदुरबार नगर परिषदेच्या (Nandurbar Zilla Parishad) नूतन प्रशासकीय नूतन इमारतीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्यात आले. उद्‌घाटन सोहळ्यास माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) संबोधित करत असताना इमारतीचे सव्वासात कोटीचा निधी शासनाकडे थकीत असल्याचे सांगितले. व ते पुढे बोलत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच ग्रामविकास विभागाच्या सचिवांना फोन करून निधीच्या मंजुरीचे आदेश काढण्याचे निर्देश दिले.

माजी आमदार रघुवंशी यांनी शासनाकडे प्रलंबित विकास कामे व अपेक्षित कामांबाबतची मागणी करत होते. त्यात नंदुरबार पालिकेचा नूतन इमारतीसाठीचा थकीत ७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी थकीत असून तो आपण मंजूर करावा, नाट्यगृह निधीबाबत असेच झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नंदुरबार दौऱ्यावरून परतताच तीन दिवसात निधी दिला होता. असे श्री. रघुवंशी यांनी आठवण सांगितली.

Eknath Shinde
Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देऊ

त्याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः मंत्रालयात सुट्टीचा दिवस असताना सचिवांना फोनवरून संपर्क साधला व पालिकेचा थकीत निधीचा मंजुरी आदेश काढण्याचे निर्देश दिले. सचिवांनी तीन मिनिटात त्याची अंमलबजावणी करीत ऑनलाइन मंजुरी आदेश पारित केला. तोच आदेश उपस्थितांना दाखवीत मुख्यमंत्री शिंदे यांनी तीन दिवस काय तीनच मिनिटात आपण निधी मंजूर केल्याचे सांगत नंदुरबारवासीयांना विशेष भेट दिली. तसेच नंदुरबार नगरपरिषदेमार्फत प्रत्येक नागरिकांचा अपघात विमा काढण्यात आला असून, अपघातग्रस्त तीन लाभार्थ्यांना यावेळी प्रत्येकी एक लाख रुपयाचा धनादेश वितरित करण्यात आला.

अशी आहे नवीन इमारत प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री व मान्यवरांनी नगरपरिषदेच्या इमारतीची पाहणी केली. इमारत उभारण्यासाठी १५ कोटी १९ लाख एवढा खर्च झाला आहे. ४५८२.९० चौरस मीटर क्षेत्रफळावर इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे.

त्यात तळमजला, पहिला मजला, दुसरा मजला व तिसरा मजला असून प्रथम मजल्यावर पोर्च, एन्ट्रन्स लॉबी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती याची दालने तर दुसऱ्या मजल्यावर १०५ व्यक्तींसाठी आसन व्यवस्था असलेले भव्य सभागृह, महिला व बाल विकास समिती, विरोधी पक्षनेत्यांची दालने, महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग, रेकॉर्ड, स्टोअर रूम, अतिक्रमण व बाजार विभाग, दिवाबत्ती, अग्निशमन, लेखा परिक्षक विभागाची कार्यालये आहेत. तर तिसऱ्या मजल्यावर रेकॉर्ड रूम, लिफ्ट रूम, क्लॉक टॉवरची रूम आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com