Radha krishna Vikhe Patil : खंडोबा देवस्थानच्या परिसर विकासासाठी दोन कोटी ः विखे

नगर जिल्ह्यात प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील जेजुरी येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानचा यात्रा उत्सव माघी पौर्णिमेला सुरू झाला.
 Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilAgrowon

Nagar News ः संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील खंडोबा देवस्थानच्या परिसर विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून २ कोटी रुपयांचा निधी (Fund for Khandoba Temple Development) उपलब्ध करून देणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radha krishna Vikhe Patil) यांनी दिली.

नगर जिल्ह्यात प्रतिजेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील जेजुरी येथील श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानचा यात्रा उत्सव माघी पौर्णिमेला सुरू झाला. यात्रेच्या पहिल्याच दिवशी मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते श्री. खंडोबाची महाआरती करण्यात आली.

देवस्थानच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धर्मदाय आयुक्त उषा पाटील, संगमनेर तालुका दूध संघाचे अध्यक्ष रणजित देशमुख, यांच्यासह अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 Radhakrishna Vikhe Patil
Gosewa Ayog : राज्यात लवकरच गोसेवा आयोगाची स्थापना : विखे

विखे पाटील म्हणाले, की गावाला आध्यात्मिक महत्त्व असल्याने दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. परंतु या तीर्थक्षेत्राची महती अधिक वाढवायची असेल तर या परिसरातील विकासाला गती द्यावी लागेल.

त्यामुळे या देवस्थानचा ब वर्गामध्ये समावेश करण्याची ग्वाही देऊन तिर्थक्षेत्र विकास योजनेतून २ कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्य महामार्गापासून देवस्थानकडे येणाऱ्या रस्त्याच्या कामाला प्राधान्य देताना या मार्गावरील पुलाच्या कामाला निधी देण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी या वेळी दिले.

यात्रेच्या निमित्ताने हिवरगाव पावसा येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने भरविण्यात आलेल्या पशू पक्षी आणि जनावारांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन मंत्री विखे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com