अतिवृष्टिग्रस्तांना जिल्हा नियोजन समितीतून निधी

अतिवृष्टीमुळे ग्रामीणसह शहरातील अनेक रस्ते, तलाव, नाले इतर वास्तूंचे नुकसान झाले. शासनाकडून कामांवर स्थगिती असल्याने मोठी अडचण होत आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नागपूर : अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) ग्रामीणसह शहरातील अनेक रस्ते, तलाव, नाले इतर वास्तूंचे नुकसान (Damage Due To Heavy Rain) झाले. शासनाकडून कामांवर स्थगिती असल्याने मोठी अडचण होत आहे. त्यामुळे शासनाने जिल्हा नियोजन समितीमधील पाच टक्क्यांचा निधी अशा कामांवर खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. पालकमंत्री नियुक्ती न झाल्याचे कामांस मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Crop Damage
Heavy Rain : मुसळधार पावसाचा मध्य प्रदेशात कहर

जुलै व ऑगस्ट महिन्यात अनेकदा अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने रस्ते, पूल वाहून गेले. तलावांचे बंधारे फुटले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. रस्ते व पूल तुटल्याने नागरिकांना ये-जा करण्यास मोठी अडचण होत आहे. पाणंद रस्ते खराब झाल्याने शेतकऱ्यांना शेतातही जाणे अवघड झाले आहे. शासनाने एप्रिल २०२१ पासूनच्या कामांना स्थगिती दिली आहे. पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतरच ही कामे करता येणार आहे. पालकमंत्री नसल्याने प्रशासकीय यंत्रणांना कोणतेही काम करता येत नाही.

Crop Damage
Crop Damage : लाखांदूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

यामुळे ग्रामीण भागातून मोठी ओरड होत आहे. अतिवृष्टिग्रस्त भागात कामे करण्यास मंजुरी देण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यामुळे आता शासनाने अशा अतिवृष्टिग्रस्त भागात कामे करण्यास निधी मंजूर केला आहे. जिल्हा नियोजन समितीतील (डीपीसी) ५ टक्के निधी अशा कामांवर खर्च करता येणार आहे. पालकमंत्री नसल्याने कामांना मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

जिल्ह्यासाठी ३१ कोटी

नागपूर जिल्ह्याला डीपीसी अंतर्गत ६२५ कोटींचा निधी मंजूर असून, सव्वाशे कोटींच्या जवळपास निधी वितरित झाला. ५ टक्केनुसार जवळपास ३१ कोटींची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com