पैठणी क्लस्टरला निधी दिला जाईल ः मुख्यमंत्री शिंदे

संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास शासन करेल
Funds will be given to Paithani cluster: CM Shinde
Funds will be given to Paithani cluster: CM ShindeAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

पैठण, जि. औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला. सोबतच पैठणीच्या (Paithani Cluster) क्लस्टरसाठी निधी दिला जाईल व संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास शासनाकडून केला जाईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले.

Funds will be given to Paithani cluster: CM Shinde
Soybean Rate : वायदेबंदीमुळं सोयाबीन उत्पादकांना फटका?

पैठण येथे सोमवारी (ता. १२) सायंकाळी झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते.आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. श्री. शिंदे म्हणाले, की दोन अडीच महिन्यात शेतकरी सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतल्याने विरोधकांना त्याची धडकी भरली आहे. ‘मविआ’च्या अडीच वर्षात राज्यात नैराश्य पसरलं होतं. सरकार लोकांसाठी असलं पाहिजे. आमचं सरकार आल्यापासून जनता मोकळा श्वास घेत आहे. टीका करणे विरोधकाचे काम असून आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ. नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. सततच्या पावसाने नुकसान होत होतं त्याचाही जीआर काढण्याचा निर्णय घेतला आहे. गोगलगायीमुळे नुकसान झालं त्याचाही निर्णय घेतलाय. आधी दोन हेक्टरपर्यंत मिळणारी नुकसान भरपाई तीन हेक्टर पर्यंत देण्याचा निर्णय घेतला. जिथे तातडीने ५ हजार दिले जायचे तिथे १५ हजार द्यायचा निर्णय घेतलाय. ‘लम्पी स्कीन’ बाबत मदतीसाठी एनडीआरएफचे निकष लावण्याचा निर्णय झाला आहे. शेतकरी आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. पैठण येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मान्य करू. संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास सरकारच्या पैशातून केला जाईल. पैठण येथील संत पिठाला २० कोटी रुपये देण्यासाठी बैठक घेऊन त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल. पैठण शहरासाठीच्या पाणीपुरवठा योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही. आधीच्या महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला ही स्थगिती दिली, त्यासाठी राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवून न्याय मिळवून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रस्ताविक विलास भुमरे यांनी केले. आमदार शहाजी पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, फलोत्पादन व रोहयो मंत्री तथा या कार्यक्रमाचे आयोजक संदीपान भुमरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. मंत्री श्री. भुमरे यांनी ब्रम्हगव्हान उपसा सिंचन योजनेला, मोसंबी क्लस्टरला निधी दिल्याबद्दल आभार मानून पैठणी क्लस्टर, शहर पाणीपुरवठा योजना, संत ज्ञानेश्वर उद्यान विकास, संतपीठ आदींसाठी निधीची मागणी केली होती, सभेला मोठी गर्दी झाली होती. सभेला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com