
Chhatrapati Sambhajinagar News : दोन दिवसीय जी-२० परिषदेसाठी (G-20 Conference) शहरात आलेल्या शिष्टमंडळातील महिला प्रतिनिधींनी मंगळवारी (ता. २८) सकाळी ‘बीबी का मकबरा’ (Bibi Ka Maqbara) या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. या वेळी भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
मकबरा व परिसरातील ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. या वेळी शिष्टमंडळाने सामूहिक फोटोशूटदेखील केले. या वेळी इंटयाक संस्थेच्या प्रतिनिधींनी परदेशी पर्यटक महिलांना या वास्तूविषयी माहिती दिली.
मकबरा परिसरात संबंधित सर्व प्रतिनिधींचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. सर्व परदेशी पाहुण्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आनंद व्यक्त केला.
''आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष'' असल्याने या मध्ये विशेष तृणधान्याचा समावेश होता. यात मूग, मटकी, ज्वारी या धान्यांपासून बनवलेले खाद्यपदार्थ होते.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, स्वप्नील मोरे, तहसीलदार शंकर लाड तसेच पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.