Flyover : उड्डाण पुलाचे १९ नोव्हेंबरला गडकरींच्या हस्ते उद्‌घाटन

शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून, १९ नोव्हेंबरला केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे.
Flyover
FlyoverAgrowon

नगर : शहरातील बहुचर्चित उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून, १९ नोव्हेंबरला केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी सोमवारी (ता. ३१) नगरमध्ये येऊन उड्डाण पुलाच्या कामाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. खासदार विखे यांच्या समवेत आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनीही उड्डाण पुलावरून वाहनाने प्रवास केला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

Flyover
Barsim Crop : बरसीम चारा पिकाची लागवड

खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, ‘‘उड्डाण पुलाच्या माध्यमातून नगरकरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मी व आमदार संग्राम जगताप आम्ही दोघांनीही जो संकल्प केला होता तो पूर्ण झाला आहे.’’ या वेळी राष्ट्रीय महामार्ग नवी दिल्ली येथील अधिकारी एस. के. मिश्रा, आशिष आसाटी, पी. जी. खोडस्कर, अंशुमती श्रीवास्तव, प्रफुल्ल दिवाण, एम. एस. वाबळे, दीपेंद्र राठोड, दिग्विजय पाटणकर, क्रीशेंद्रा द्रिवेदी,

राजा मुखर्जी, महेश मिश्रा, दिबँड पॉल, अलोक कुमार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे नगर जिल्ह्याच्या सौंदर्यकारणात भर पडली आहे. या कामासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे योगदान लाभले आहे. स्वर्गीय खासदार दिलीप गांधी यांनी देखील उड्डाण पूल मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता.

२० नोव्हेंबरपासून नगरकरांसाठी हा उड्डाणपूल खुला होईल, याचा विखे यांनी पुनरुच्चार केला. आमदार संग्राम जगताप म्हणाले, उड्डाण पुलाच्या माध्यमातून नगर शहराच्या वैभवात भर पडली आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते १९ नोव्हेंबरला लोकार्पण सोहळा होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com