Rain : मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यात देशात सर्वसाधारण पाऊस

नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामामध्ये दुसऱ्या टप्प्यात देशात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सोमवारी (ता. १) जाहीर केला.
Monsoon Update
Monsoon Update Agrowon

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामामध्ये (Monsoon Season) दुसऱ्या टप्प्यात देशात सर्वसाधारण पाऊस (General Rainfall) पडणार आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department ) (आयएमडी) सोमवारी (ता. १) जाहीर केला. ऑगस्ट महिन्यातही देशात ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाजही (Rain Forecast) यावेळी वर्तविण्यात आला आहे.

हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा (Dr. Mrutunjay Mahapatra) यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत मॉन्सून हंगामाचा दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. १९७१ ते २०२० कालावधीत देशातील मॉन्सून पावसाची आकडेवारी पाहता, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरी ४२२.८ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.

Monsoon Update
Monsoon : पुढेही समाधानकारक मॉन्सूनचे संकेत

मॉन्सूनच्या अखेरच्या टप्प्यातील दोन महिन्यात देशात ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. यात पश्चिम मध्य भारत, वायव्य भारत, दक्षिण भारताच्या पूर्व भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम किनारपट्टी, पूर्वमध्य भारत, पूर्वेकडील राज्ये आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Monsoon Update
Heavy Rain : अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच

ला निना स्थिती कायम

विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या सर्वसामान्य ला-निना स्थिती असून, ती मॉन्सून हंगामाबरोबरच वर्षाअखेरपर्यंत कायम राहणार आहे. सध्या भारतीय समुद्रात सर्वसाधारण आयओडी स्थिती आहे. उर्वरित मॉन्सून हंगामात आयओडी नकारात्मक स्थितीत जाण्याचे संकेत आहेत.

ऑगस्टमध्ये देशात सर्वसाधारण पाऊस

भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात सर्वसाधारण म्हणजेच ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. १९७१ ते २०२० कालावधीत ऑगस्ट महिन्याची पावसाची दीर्घकालीन सरासरी २५४.९ मिलिमीटर आहे. ऑगस्टमध्ये दक्षिण भारताचा पूर्व भाग, वायव्य भारत आणि लगतच्या पश्चिम मध्य भारतात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम किनारपट्टी, पूर्वमध्य भारत, पूर्व भारतातील राज्य आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे.

महाराष्ट्रासाठी ऑगस्ट कमी पावसाचा ?

मॉन्सूनच्या शेवटच्या दोन महिन्यातील पावसाचा विचार करता, महाराष्ट्राच्या दक्षिण कोकण, पूर्व विदर्भ वगळता बहुतांशी भागात सरासरी पेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. मात्र ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. यात उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे.

जुलै महिन्यात शेवटचा आठवडा वगळता देशात चांगला पाऊस झाला. २००५ मध्ये देशात जूलै महिन्याच्या १९ टक्के अधिक पाऊस पडला होता. त्यानंतर यंदाच्या जुलै महिन्यात १७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. जुलैमध्ये चार कमी दाब प्रणाली तयार झाल्या, त्या २१ दिवस सक्रिय होत्या. तर मॉन्सूनचा आस तब्बल २६ दिवस दक्षिणेकडे होता. ला-निना स्थिती बरोबरच, मेडियन ज्युलियन आसोलेशन देखील पोषक स्थितीत राहिला. यातच आणि अरबी समुद्रावरून मॉन्सूनचे प्रवाह जोरदार असल्याने चांगला पाऊस झाला.

- डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, हवामान विभाग.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com