Geo Tagiing : धुळे जिल्ह्यातील ५७ गावांचे जिओ टॅगिंग पूर्ण

गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जिल्ह्यातील गावांच्या ड्रोन सर्वेक्षणाच्या कामास गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.
Drone Survey
Drone SurveyAgrowon

धुळे ः गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत (Drone Survey) सुरू असलेल्या जिल्ह्यातील गावांच्या ड्रोन सर्वेक्षणाच्या कामास गती देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले. जिल्ह्यातील गावठाण जमाबंदी (Settlement Of Land Revenue) प्रकल्पाच्या (स्वामित्व योजना/ड्रोन सर्व्हे) जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

Drone Survey
Drone Technology : शेती नियोजनासाठी ड्रोन तंत्रज्ञान

जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख प्रशांत बिलोलीकर, ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, जिल्हा सूचना विज्ञान केंद्र अधिकारी एम. व्ही. खडसे, नगररचना विभागाचे सहायक संचालक नंदकुमार मोरे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू, भूमिअभिलेख विभागाचे दिलीप काकड आदी उपस्थित होते.

Drone Survey
Onion Rate : कांदा उत्पादकांचा पुन्हा भ्रमनिरास | ॲग्रोवन

प्रचार, प्रसाराची सूचना

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, की जिल्ह्यातील गावांचे ड्रोन सर्वेक्षण गतीने पूर्ण करण्यासाठी तालुका व ग्रामपंचायत स्तरातवर संनियंत्रण व अंमलबजावणी समित्या गठित कराव्यात. यासाठी भूमिअभिलेख व जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने एकमेकांत समन्वय राखावा.

गावठाण जमाबंदी प्रकल्प हा पथदर्शी प्रकल्प असल्याने हे काम बिनचूक होण्यासाठी संबंधितांची कार्यशाळा घेऊन त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे. या प्रकल्पाची नागरिकांना माहिती होण्यासाठी प्रचार व प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com