SIILC : ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटद्वारे मिळवा स्टार्टअप, नोकरीचा आत्मविश्वास

नवव्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात; १७ ऑक्टोबरला सुरूवात
 SIILC
SIILCAgrowon

पुणे : पदवीधर असूनही योग्य गुणवत्तेचे, मार्केटची (Market) पुरेशी माहिती व परिपूर्ण कौशल्य असलेले उमेदवार इंडस्ट्रींना मिळत नाही. त्यामुळे कुशल मनुष्यबळ मिळविण्याची मोठी समस्या इंडस्ट्रीला नेहमीच भेडसावते. दुसरीकडे अनेक तरुण स्वतःचा स्टार्टअप (Startup) सुरु करण्याविषयी बोलताना दिसतात. परंतु, स्वतःमध्ये उद्योजकीय मानसिकतेचा पुरेसा आत्मविश्वास, व्यवसायाचे ज्ञान, प्रभावी संभाषण, बिझनेस मॅनेजमेंट (Business Management) आदीचा अभाव आहे. त्यामुळे  स्वतःचा उद्योग-व्यवसाय करण्याबाबत त्यांची द्विधा मनःस्थिती दिसते. ही अवस्था शैक्षणिक अभ्यासक्रम आणि इंडस्ट्रींची खरी गरज यातील तफावतीमुळे दिसून येते.

 SIILC
Monsoon: मॉन्सूनच्या वाटचालीवर उद्योग क्षेत्राची नजर

इंडस्ट्री व शिक्षण तज्ज्ञांसोबत सखोल विचारविनिमय करून ‘सकाळ’ व ‘ॲग्रोवन’ संलग्न ‘एसआयआयएलसी’ संस्थेने एक वर्षाचा इंडस्ट्री संलग्न असा ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ अभ्यासक्रम तयार केला आहे. याद्वारे आजवर अनेक तरूणांनी स्वतःमध्ये उद्योजकतेचे, उत्तम रोजगार मिळविण्याचे कौशल्य आत्मसात करून आपले उद्दिष्ट साकारले आहे.अभ्यासक्रमाच्या ९ व्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. १७ ऑक्टोबर रोजी बॅच सुरू होणार आहे.

 SIILC
Cotton Rate : पाकिस्तानची कापूस मागणी दराला आधार देईल का? | Agrowon | ॲग्रोवन

कृषिसंलग्न खते, बि-बियाणे, कीडनाशके, इरिगेशन, टिश्‍युकल्चर, यंत्रे-अवजारे, अन्नप्रक्रिया उद्योग, डेअरी उद्योग, निर्यात उद्योग इ.सर्व इंडस्ट्रींना ज्या प्रकारचे कुशल उमेदवार लागतात, तसे कौशल्य (स्किल्स) पदवीधर (ग्रॅज्युएट) विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणारा हा अभ्यासक्रम आहे. बिझनेस मॅनेजमेंटशी निगडित सर्व विषयांबरोबरच सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या महत्त्वाच्या अशा ॲग्री एक्‍स्पोर्ट, डेअरी आणि  फूड टेक्‍नॉलॉजी या तीन विषयांत स्पेशलायझेशन तसेच सहा महिने इंडस्ट्रींसोबत पेड इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध आहे. 

 SIILC
Soybean Rate : सोयाबीन दर पुन्हा सावरले

या व्यतिरिक्त बिझनेस कम्युनिकेशन, मुलाखतीचे प्रशिक्षण, उद्योजकता विकास आदीचाही समावेश अभ्यासक्रमात आहे. आपण पदवीधर असून पुढे कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, या विवंचनेत असाल तर अजूनही संधी गेलेली नाही. बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीई, बीटेक, बीसीएस इ. कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर (२१ ते २५ वयोगट) विद्यार्थी या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत. प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा.
संपर्क : ९८८१०९९४२६.
संकेतस्थळ : www.siilc.edu.in

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com