Gharkul Fund : खोट्या कागदपत्रांद्वारे घरकुलाचा निधी हडपला

उमराणी (ता. धडगाव) येथील रहिवासी मात्र सध्या मध्य प्रदेशात वास्तव्यास असलेल्या रमेश सोन्या ठाकरे यांच्या नावाने बनावट कागदपत्रे करून घरकुलांचा निधी दोनदा हडप केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
Gharkul Fund
Gharkul FundAgrowon

नंदुरबार ः उमराणी (ता. धडगाव) येथील रहिवासी मात्र सध्या मध्य प्रदेशात वास्तव्यास असलेल्या रमेश सोन्या ठाकरे यांच्या नावाने बनावट कागदपत्रे करून घरकुलांचा निधी (Gharkul Fund) दोनदा हडप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या ठाकरे कुटुंबातील कुणालाही घरकुले मिळालेली नाहीत. मात्र त्यांनी अनुदान घेतल्याचे सांगत गटविकास अधिकारी सी. टी. गोस्वामी यांनी त्यांना तुमच्याविरोधात फौजदारी गुन्हा का दाखल करू नये, अशी नोटीस काढली आहे.

Gharkul Fund
Tanpure Sugar Mill : राहुरीचा ‘तनपुरे कारखाना’ जिल्हा बँकेच्या ताब्यात

रमेश ठाकरे यांच्यासह त्यांचा कुटुंबातील पाच जणांना ग्रामीण आवास योजनेत घरकुले मंजूर झाले आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांना लाभ मिळालेला नाही. रमेश ठाकरे यांच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करण्यात आले. त्यावर क्रमांक दुसऱ्याचा, छायाचित्र तिसऱ्याचे, तर संपर्क क्रमाक वेगळाच आहे.

तो डायल केल्यावर बंद येतो, अशी जुळवाजुळव करून तयार केलेल्या आधारकार्डाच्या माध्यमातून मांडवी (ता. धडगाव) येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत एकाच नावाने दोन वेगळे खाते उघडले. दोन्ही खात्यांवर आधार क्रमांक एकच आहे. अर्जावर छायाचित्र रमेश ठाकरेंऐवजी ठाणसिंग वांगऱ्या पावरा यांचे आहे.

Gharkul Fund
Crop Insurance : मंत्री सावे यांनी पीक विमा कंपन्यांना दिला इशारा | ॲग्रोवन

हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून सी. टी. गोस्वामी यांनी रमेश सोन्या ठाकरेसह सोन्या रेवला ठाकरे, दिलीप सोन्या वसावे, राज्या दाज्या ठाकरे, अशोक दाज्या ठाकरे, पिंट्या सोन्या ठाकरे व दाज्या रेवल्या ठाकरे या सात जणांना ४ नोव्हेंबरला नोटीस बजावली.

दोनदा रक्कम केली वर्ग

रमेश ठाकरे यांच्या खाते क्रमांक ३८४७६९५८९४ वर २ जून २०२१ ला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गवंडी प्रशिक्षण योजनेत एक लाख २० हजार रुपये शासकीय खात्यावर जमा झाले आहेत. त्यातील २० हजार काढले. उर्वरित एक लाख ११० रुपये त्या खात्यावरून ०५१२०२६२५६६ या खात्यावर वर्ग केले. त्यानंतर पुन्हा या खात्यावर पहिला हप्ता १५ हजार व दुसरा हप्ता ४५ हजार असे ६० हजार रुपये बोगस खात्यावर जमा झाले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com