GI Tagging : पुरंदरमधील ५१२ अंजीर उत्पादकांना‘जीआय’ मानांकन प्रमाणपत्र

पुरंदर तालुक्यातील अंजिराला आता जीआय मानांकन मिळाले असून, सासवड येथील पांडुरंग भवन येथे प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. एकूण ५१२ शेतकऱ्यांना अंजीर ‘जीआय’ मानांकनाचे अंजीर पीक प्रशस्तिपत्रक मंजूर करण्यात आले आहे.
Fig Crop
Fig CropAgrowon

पुणे : पुरंदर तालुक्यातील अंजिराला आता जीआय मानांकन (GI Rating For FIg) मिळाले असून, सासवड येथील पांडुरंग भवन येथे प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. एकूण ५१२ शेतकऱ्यांना अंजीर ‘जीआय’ मानांकनाचे अंजीर पीक (Fig Crop) प्रशस्तिपत्रक मंजूर करण्यात आले आहे. तर तालुक्यातील ४०० शेतकऱ्यांना प्रशस्तिपत्रक वितरित करण्यात आले.

Fig Crop
Fig Crop Disease : अंजिरातील एकात्मिक रोगनियंत्रण

कृषी विभाग, अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघ व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कृषी मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भौगोलिक मानांकन प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

Fig Crop
Fig Season : परतीच्‍या पावसामुळे अंजिराचा हंगाम लांबणीवर

या वेळी आमदार संजय जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, कृषी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. दशरथ ठवाळ, राज्यस्तरीय सल्लागार गोविंद हांडे, अंजीर व सीताफळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ युवराज बालगुडे, अंजीर निर्यातदार पुरंदर हायलँड्स शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रोहन उरसाळ, खोर फूड्स लिमिटेडचे अध्यक्ष समीर डोंबे, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, अप्पासाहेब काळभोर, रामचंद्र खेडेकर, दिलीप जाधव, प्रदीप पोमन तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमालाउपस्थित होते.

देशभरातील एकूण १२९ भौगोलिक मानांकनामध्ये महाराष्ट्राचा २६ विविध मानांकन रजिस्ट्रेशनमध्ये सर्वांत प्रथम क्रमांक लागतो. देशभरातील सासवड, पुरंदरमधील अंजीर हे भौगोलिक मानांकन असल्याची माहिती राज्यस्तरीय सल्लागार पुणेचे गोविंद हांडे यांनी दिली.

‘जीआय’मुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रॅँड होणार

भौगोलिक मानांकनामुळे मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होणार असून, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रॅँड होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पुरंदर अंजिरास जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. २०१४ मध्ये पुरंदरच्या अंजिरास जीआय मानांकन मिळाले होते. परंतु २०२२ मध्ये अधिकृतरीत्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com