Ginger Processing : आले गुणधर्मात श्रेष्ठ; प्रक्रियेची वाणवा

जगात उत्पादनात दुसऱ्या स्थानावर असूनही केवळ प्रक्रिया उद्योगाला चालना आणि संशोधनाची वाणवा असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे.
Ginger Rate
Ginger RateAgrowon

सातारा : भारतीय आले पीक (Indian Ginger Crop) आपल्या श्रेष्ठ गुणधर्माकरिता ओळखले जाते. अन्न, औषध, मसाला (Spices) आदी. प्रक्रियेत याचा महत्त्वाचा वापर होतो. याशिवाय, जगात उत्पादनात (Ginger Production) दुसऱ्या स्थानावर असूनही केवळ प्रक्रिया उद्योगाला (Ginger Processing) चालना आणि संशोधनाची वाणवा असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. स्पर्धेच्या युगात अन्न प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन मिळाल्यास बाजारपेठीय शोषणातून शेतकऱ्यांची सुटका होऊ शकेल, असे जाणकार सांगतात.

दृष्टिक्षेपात उत्पादन (टन)

चीन : ३९ लाख ६६ हजार

भारत : ३८ लाख ५३ हजार

आसाम : १६ लाख ७३ हजार

महाराष्ट्र : १४ लाख ६ हजार

Ginger Rate
Ginger Market : आले दरात घसरणच अधिक...

जगात चीन आले पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेतो, भारताचा दुसरा क्रमांक असून, देशांतर्गत उत्पादनात आसाम सर्वाधिक, तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. आल्यापासून पावडर, तेल, कॅण्डी, बिअर, पेस्ट आदी प्रकारचे प्रक्रिया उत्पादन केले जाते. गुणधर्मामुळे औषधात वापर होतो, मात्र यास मर्यादा आहे.

Ginger Rate
Ginger Rate : आले पिकाला हवा प्रक्रियेचा आधार

प्रक्रिया उद्योग जिल्हास्तरावर उभे राहिल्यास आले पीक केवळ बाजारातील व्यापाऱ्यांकडे वेठीस धरले जाणार नाही, यातून स्पर्धा निर्माण होऊन थेट दरवाढ मिळण्यासही मदत होईल. या उद्योगांमुळे रोजगार वाढेल आणि उत्पादनही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातूनही प्रक्रियेला चालना देणे शक्य असल्याने राज्य शासनाने याबाबत ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अन्यथा, हे पीक काही वर्षांत औषधाला उरणार नसल्याचे शेतकरी सांगत आहे.

संशोधन केंद्राचा अभाव

आले उत्पादनात अग्रेसर असतानाही या पिकाच्या संशोधनाबाबत कसलेही काम होताना दिसत नाहीत. शेतकरी एकमेकांकडील बेणे बदल करून उत्पादन घेतात. राज्यात आले पीक संशोधन केंद्र सुरू केल्यास शेतकऱ्यांना उत्पादनक्षम बेणे मिळू शकेल. तसेच मूळकुजीसह रोग-किडींच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन मिळेल, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

आले प्रक्रियेबाबत कोणतेही ठोस व्यावसायिक संशोधन नसल्याने प्रक्रिया उद्योग याकडे आकर्षित होत नाही. याशिवाय सरकार पातळीवर कोणत्याही प्रोत्साहनपर योजना नसल्याने विशेष गुंतवणूक या क्षेत्राकरिता केली जात नाही. वास्तविक भारतीय आले हे गुणधर्माने श्रेष्ठ असून, याकरिता चांगली पावले उचलली, तर केवळ प्रक्रिया उद्योगास नव्हे तर उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगले दिवस येतील.
एक उद्योजक
कमी भांडवलात आले पिकांची उत्पादन वाढ व्हावी यासाठी तज्ज्ञांकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे. आले पिकांस चांगला दर मिळावा यासाठी प्रक्रिया उद्योगाला चालना द्यावी. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध लागण्यासाठी आले पिकांचे संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी राज्यशासनाने पुढाकार घेतला पाहिजे.
योगेश पवार, प्रगतिशील शेतकरी, वर्णे, जि. सातारा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com