तेंदूपाने तोडायची मजुरी द्या’

तालुक्यातील ग्रामपंचायत मल्लमपोडूरअंतर्गत येणाऱ्या नऊ गावांतील लोकांचे तेंदूपानांचे पैसे पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी मिळाले नाहीत.
तेंदूपाने
तेंदूपानेagrowon

भामरागड, जि. गडचिरोली : तालुक्यातील ग्रामपंचायत मल्लमपोडूरअंतर्गत येणाऱ्या नऊ गावांतील लोकांचे तेंदूपानांचे पैसे पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी मिळाले नाहीत. त्यामुळे ‘तेंदूपानांच्या मजुरीचे पैसे कुणीतरी मिळवून द्या हो,’ अशी आर्त हाक ग्रामस्थांनी बुधवारी (ता. २) दिली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना ग्रामस्थ म्हणाले, की दरवर्षी उन्हाळ्याच्या मे महिन्यात सर्वत्र तेंदूपत्ता तोडायचे काम चालते. येथील भोळ्याभाबड्या जनतेचा आर्थिक बजेट तेंदूपाने तोडाईवरच अवलंबून असते. मात्र या वर्षी पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही तेंदूपत्ता तोडणीच्या मजुरीचे पैसे कंत्राटदारांनी दिले नाहीत.

त्यामुळे येथील जनता आर्थिक विवंचनेत आहे. या वर्षी अली ट्रेडर्सतर्फे महम्मद अश्रफ अली मु. खाजिपुरा (ता. जगीत्याल, जि. करीमनगर) या तेलंगणातील कंत्राटदारांनी ग्रामपंचायत मल्लमपोडूर‌‌‌ अंतर्गत येणाऱ्या मल्लमपोडूर, कुक्कामेटा, हिन्देवाडा, ईरपनार, मुरंगल, भुसेवाडा, पिट्टेकसा, सुंदरनगर, मुसपाडी या नऊ गावांत तेंदूपाने तोडणीचे कंत्राट घेतले होते. त्यासाठी ‘पेसा’अंतर्गत ग्रामकोश समिती व कंत्राटदार यांच्यात करारनामा झाला.

मे महिन्यात तेंदूपाने तोडणीचे काम सुरू झाले. जूनमध्ये बोद (गोणी) भरती केली. सर्व गावांतील बोद संकलित करून चंद्रपूर जिल्ह्यातील राजोली येथील गोडाउनमध्ये जमा करण्यात आले. कंत्राटदाराला वारंवार पैशांची मागणी करण्यात आली. तेंदूपाने तेंदूफळीवर दिल्यापासून कंत्राटदारांनी सात दिवसांच्या आत संकलनाची मजुरी अदा करावी लागेल, असे करारनाम्यात नमूद आहे. वारंवार मजुरीची मागणी करूनही पैसे मिळाले नाहीत.

तेंदूपाने
e-crop survey : ई-पीकपाहणी अॅपद्वारे पीक पेऱ्याची नोंद असलेला सातबारा ग्राह्य धरावा

त्यामुळे पोलिसांनासुद्धा पैसे मिळवून देण्यासाठी निवेदन देण्यात आले. कंत्राटदारांनी १८ ऑगस्टपर्यंत मजुरी देण्याचे स्टॅम्प पेपरवर लिहून दिले. संवर्ग विकास अधिकारी भामरागड यांच्याकडे सुद्धा निवेदन दिले. मात्र अजूनही मजुरी मिळाली नाही. कंत्राटदाराला फोन केला असता फोन लागत नाही.

मजुरी त्वरित न मिळाल्यास आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालू, असा निर्वाणीचा इशारा गावकऱ्यांनी दिला. ग्राम कोश समिती मल्लमपोडूरचे अध्यक्ष लच्छुराम दुर्वे, भुसेवाडाचे सुखराम मिच्चा, ईरपनारचे संजय गावडे, हिन्देवाडाचे जुरू मुहुंदा

कुक्कामेटाचे लालसू कुरसामी, मुरंगलचे गोंगलू पुसू महाका, सुंदरनगरचे भास्कर इष्टाम, टी. पी. चे सचिव मनोहर सडमेक, सरपंच रोशन वड्डे, रामा वड्डे तसेच नऊही गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मल्लमपोडूरवासींची तेंदूपाने तोडणीची मजुरी मिळाली नसल्याची तक्रार १५ जून २०२२ रोजी मिळाली. त्याच दिवशी संबंधित कंत्राटदार व ग्रामसभांना पत्र पाठवून सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र गावकऱ्यांनी दिलेल्या कंत्राटदाराच्या पत्त्यावर जे पत्र पाठवले ते परत आले. तसेच जिल्ह्यातील वरिष्ठांनाही यासंबंधीची माहिती पाठवली. कंत्राटदार न आल्यामुळे सुनावणी झाली नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com