
वर्धा : ‘जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये हेक्टरी भरपाई द्या,’ अशी मागणी बहुजन समाज पार्टीने (BSP) केली आहे.
जिल्ह्यात पुरामुळे (Flood)अनेक गावांना पाण्याने वेढलेले आहे, तर अनेक घरांची पडझड झाली आहे. अनेक लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. काही ठिकाणी जीवित व वित्त हानी झाली आहे. या अस्मानी संकटामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
शेती, पीक नुकसानीचे (Crop Damage) तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई (Compensation) देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पुरांमुळे (Flood) ज्यांची घरे पडली, घरगुती सामानाचे नुकसान झाले, त्यांना आर्थिक सानुग्रह मदत तत्काळ देण्यात यावी या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष मोहन राईकवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
या वेळी बसपाचे प्रदेश प्रभारी ॲड. सुनील डोंगरे, जिल्हा महासचिव अनोमदर्शी भैसारे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील देशमुख, जिल्हा कोष्याध्यक्ष सुनील भगत, जिल्हा सचिव सुदेश जवादे, बी.व्ही.एफ. संयोजक विजय ढोबळे, वर्धा विधानसभा अध्यक्ष दिनेश वाणी, वर्धा विधानसभा उपाध्यक्ष विपुल बौद्ध, आर्वी विधानसभा अध्यक्ष मनोज माहोरे, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष रवी भगत, देवळी विधानसभा अध्यक्ष नागेश खोब्रागडे, नीतेश कांबळे, सिद्धार्थ ढेपे, सुधाकर जुनघरे, दीपक भगत, सिद्धार्थ नगराळे, अरविंद पाटील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.