शेतकरी तिहेरी संकटात: निकष बाजूला ठेवून मदत करा

गोगल गाईने बाधित (snails) झालेल्या शेतकऱ्यांना मदत (Compensation) मिळाली पाहिजे. यासंदर्भात आतापर्यंत पंचनामेही झालेले नाहीत. हे पंचनामे तात्काळ करण्याची मागणी आपण फडणवीस यांच्याकडे केल्याचे मुंडे म्हणाले.
snails
snailsAgrowon

मुंबई : राज्यातील शेतकरी सध्या तिहेरी संकटाला सामोरे जात आहेत. त्यामुळे सरकारने सगळे निकष बाजूला सारत शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत करावी, त्यासाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली.

आज मुंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुंडे म्हणाले, गोगलगाईमुळे १० हजार हेक्टर जमिनीतील पीक खराब झालेय. बुधवारी जो निर्णय राज्य सरकारने घेतला त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत होणार नाही.

snails
Irrigation: झारखंडकडून सिंचनासाठी आर्थिक पॅकेजची मागणी

गोगल गाईने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. यासंदर्भात आतापर्यंत पंचनामेही झालेले नाहीत. हे पंचनामे तात्काळ करण्याची मागणी आपण फडणवीस यांच्याकडे केल्याचे मुंडे म्हणाले. सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचे झाले आहे. आजवर दोन व्यक्ती सरकार चालवत होते. मंत्रिमंडळ विस्तार तर झालाय आता खातेवाटप झालेले नाही. जेव्हा लोकांच्या अडचणी संपतील, तेव्हाच राज्यात सरकार आले असे लोकांना वाटेल, असेही मुंडे यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारच्या काल (१० ऑगस्ट) झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत (Cabinet Decision) पूरग्रस्त भागातील नागरिक व शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापलिकडे जाऊन दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला.

शिंदे सरकारच्या या निर्णयाचे काहीजणांनी स्वागत केले तर विरोधकांना ही मदत तुटपुंजी असल्याचे म्हटले. मुंडे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी ट्विट करत बीड जिल्हा आणि मराठवाड्यातील (Maraathwada farmers) शेतकऱ्यांची परिस्थिती सांगितली.

दरम्यान मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये, मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याचा निर्णय घेतला.असे असले तरी आमच्या बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी सोयाबीनसह विविध पिकांचे गोगलगायीनी जे नुकसान केले, त्यास मदत मिळाली नाही. त्यांना विशेष आर्थिक मदत देण्यात यावी.

snails
पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून : कालावधीवरून सरकार, विरोधकांत मतभेद

मागील काळात बोंड अळीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे मदत केली गेली, त्याप्रमाणे आमच्या शेतकऱ्यांना निकष बाजूला ठेवून विशेष आर्थिक मदत देण्याची गरज आहे. वाया गेलेल्या तीन-चार पेरण्या, गोगलगायींचे नियंत्रण व संपत चाललेला हंगाम असे तिहेरी संकट आहे. त्यामुळे सरकारने जाहीर केलेली मदत ही पुरेशी नाही. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज देऊनच दिलासा मिळू शकतो, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com