‘शेतीपूरक व्यवसायातील समस्यांची माहिती द्या’

‘‘शेतकऱ्यांना पूरक व्यवसायात येणाऱ्या समस्यांची माहिती कोष्टक स्वरूपात सादर करावी. या बाबत सर्व शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत उपाययोजना कराव्यात,’’ असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.
‘शेतीपूरक व्यवसायातील समस्यांची माहिती द्या’
Bachhu KaduAgrowon

अमरावती: ‘‘शेतकऱ्यांना पूरक व्यवसायात येणाऱ्या समस्यांची माहिती कोष्टक स्वरूपात सादर करावी. या बाबत सर्व शेतकऱ्यांचे सर्वेक्षण (Farmer Survey) करून त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत उपाययोजना कराव्यात,’’ असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू (Bachhu Kadu) यांनी दिले.

पशुसंवर्धन (Animal Husbandry) व जलसंपदा विभागाच्या विविध विषयांचा आढावा कडू यांनी घेतला. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे, सहायक आयुक्त डॉ. राजेंद्र पेठे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके आदी उपस्थित होते.

‘चांदुर बाजार तालुका लघू पशुवैद्यकीय चिकित्सालयाला अतिरिक्त जागेची आवश्यकता आहे. आवश्यक जागेच्या मागणीबाबत प्रस्ताव तत्काळ सादर करा. धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झाले आहे. रुग्णालयानजिक असलेला पशुवैद्यकीय दवाखाना नगरपंचायतीच्या जागेवर तातडीने स्थलांतरित करावा, या साठी प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाकडून हा प्रस्ताव देऊन पाठपुरावा करावा,’’ असे निर्देश कडू यांनी दिले.

‘‘मोर्शी तालुक्यातील निम्न चारगड प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित कामांचा आढावा घेताना १७० कुटूंबियांच्या घराच्या मूल्यांकनात राहिलेल्या त्रुटींबाबत अहवाल सादर करा. तक्रारदात्यांच्या घराच्या फेरमूल्यांकनाची प्रक्रिया व त्याबाबतचे फेरनिवाडे तत्काळ करावेत. येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेतील समस्या प्राधान्याने सोडवावेत,’’ असे निर्देश त्यांनी दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com