Apmc Market : ‘बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे निवृत्तिवेतन द्या’

कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवानिवृत्ती वेतन द्यावे अशी मागणी परभणी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
Apmc Market
Apmc MarketAgrowon

परभणी ः कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवानिवृत्ती वेतन द्यावे अशी मागणी परभणी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती (Apmc Market Parbhani) सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडे करण्यात आली.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा १९६३ नुसार बाजार समितीचे अधिकारी व सेवकांकरिता सेवेचे नियम व अटी अंतर्गत नियम १०० यास पात्र राहून संचालकांचे पूर्व संमतीने बाजार समितीला आवश्यक वाटतील असे अधिकारी व सेवक वर्ग नेमून घेण्याचा अधिकार, सर्व प्रकारचे वेतन, भत्ते, उपदान, सेवानिवृत्ती वेतन या संबंधीचे नियम संचालकाच्या पूर्व संमतीने ठरविले जातील असे स्पष्ट असल्यामुळे 7 वर्षापासून परभणी कर्मचारी संघटना व अन्य कर्मचारी सेवानिवृत्ती वेतनाची सतत मागणी करीत आहेत. या बाबत आवश्यक तो कायदेशीर धोरणात्मक निर्णय घ्यावा.

Apmc Market
Pune APMC Election " तब्बल २० वर्षांनी होणार पुणे बाजार समिती निवडणूक

आश्वासनांची पुर्तता शक्य तितक्या लवकर व्हावी, अशी मागणी परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंदराव देशमुख, बस्वराज वैजापुरे, महादेव काळे, बन्सीधर रेंगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com