Farmers Issue: मुख्यमंत्री महोदय, आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक घ्या : बाळासाहेब थोरात

शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अन लगेच कामाला सुरुवात केली. पहिल्याच बैठकीत आरे कारशेड, आपत्ती व्यवस्थापनाबाबत निर्णय घेतला. जी त्वरा या विषयात दाखवली त्यापेक्षा अधिक घाई शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर (Farmers Isuues) बैठक घेण्यासाठी करायला हवी.
Maharashtra Farmers
Maharashtra FarmersAgrowon

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाले याचा आनंद आहे, मात्र या सत्तासंघर्षाच्या काळात मंत्र्यांचे, लोकप्रतिनिधींचे राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. जून गेला, जुलैचा पहिला आठवडा होतोय, मात्र अद्याप पाऊस झालेला नाही, राज्यात दुबार पेरणी संकट उभे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ बैठक घेऊन याबाबतचा आढावा घ्यावा आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, असे आवाहन काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आज केले.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानिमित्त शिंदे यांचे अभिनंदन करताना थोरात बोलत होते. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली अन लगेच कामाला सुरुवात केली. पहिल्याच बैठकीत आरे कारशेड, आपत्ती व्यवस्थापनाबाबत निर्णय घेतला. जी त्वरा या विषयात दाखवली त्यापेक्षा अधिक घाई शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक घेण्यासाठी करायला हवी.

Maharashtra Farmers
Vote Of Trust: शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला

तिकडे पूर इकडे दुष्काळ

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे समर्थक आमदार तिकडे थंड वातावरणात गुवाहाटीत मुक्कामी होते. तिकडे पूर आला. इकडे राज्यात दुष्काळासारखी अवस्था आहे. ७ जून रोजी राज्यात मॉन्सून (Monsoon) दाखल होतो. संपूर्ण जून महिना उलटून गेला. जुलैचा पहिला आठवडा जातोय. पावसाअभावी पेरण्या रखडल्यात. ज्यांनी पेरणी केल्या, त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली. खतांचा प्रश्न आहे, बियाण्यांचा मुद्दा आहे. गुवाहाटीत बसलेल्या आमदारांना मतदारसंघात काय अवस्था आहे हे ठाऊक नाही. गुलाबराव जळगावमध्ये जाऊन आले असतील की नाही ? मला माहीत नाही. मात्र तिकडे शेतीची काय स्थिती आहे ते पहा.

Maharashtra Farmers
Assembly Speakar:विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

सत्ता मिळाली, सत्तांतर झाले. लोक चार दिवस कौतुक करतात, सत्कार करतात, हारतुरे घालतात, मात्र त्यांनतर आपापल्या मतदारसंघात गेल्यावर प्रश्न विचारतात. अलीकडील काळात असा दबाव वाढला आहे. लोक विकासकामांबाबत विचारणा करता. अमुक काम का झालं नाही? असे प्रश्न विचारतात.त्यामुळे या सगळ्याकडे शिंदे यांच्या सरकारने गांभीर्याने बघायला हवे, असे सांगत थोरात यांनी आजच्या आज राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर (Farmers Issues) बैठक घेण्याचा आग्रह धरला.

काँग्रेसवर विनाकारण निशाणा

महाविकास आघाडीचे (Maha vikas Aaghadi) सरकार होते. सगळ्या पक्षांनी विकासाच्या मुद्यावर सर्वसमावेशक रीतीने काम केले. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. शिंदे मुख्यमंत्री झाले, त्यांना शुभेच्छा आहेत, मात्र या घडामोडींमध्ये बाजूला होताना काँग्रेसला निष्कारण लक्ष्य करण्यात आले, ते टाळले असते तर बरे झाले असते, असेही थोरात यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com