Jat Water Issue : पाणी द्या, नाहीतर कर्नाटकात जाऊ द्या

आम्ही अनेक वर्षे पाण्यासाठी संघर्ष करतोय. महाराष्ट्रातील कोणत्याच पक्षाने गांभीर्याने घेतले नाही.
Jat Water Issue
Jat Water IssueAgrowon

जत, जि. सांगली ः आम्ही अनेक वर्षे पाण्यासाठी संघर्ष (Battle For Water) करतोय. महाराष्ट्रातील (Political Party In Maharashtra) कोणत्याच पक्षाने गांभीर्याने घेतले नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी (Karnataka CM) जत पूर्वभागातील ४२ गावे कर्नाटकात घेणार, असे म्हणताच महाराष्ट्र शासन व विरोधी पक्षनेते जागे झाले; मात्र, महाराष्ट्र सरकारने पाणी कधी देणार, हे उमदीत येऊन सांगावे, अन्यथा आम्ही पुन्हा नव्याने प्रस्ताव घेऊन कर्नाटकात जाऊ, असा इशारा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार यांनी सर्वपक्षीय सभेत दिला.

Jat Water Issue
Jat Border Issue : जत तालुक्यात पाणी, सीमा प्रश्न पुन्हा पेटला

जत तालुक्यातील वंचित ४२ गावांच्या पाणीप्रश्नासाठी विचारविनिमय करण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संघर्ष समितीने बोलवली होती. या वेळी काँग्रेसचे नेते वहाब मुल्ला, मानसिद्ध पुजारी, नारायण ऐवळे, अण्णाप्पा आडवी, राजू कोळगिरी, दावल शेख आदी उपस्थित होते.

Jat Water Issue
Jat Water Crisis : आजपर्यंत आम्हाला जिवंतपणी मारण्याचे काम केले

पोरदार म्हणाले, की आम्ही पाकिस्तानात जात नाही, तर शेजारच्या राज्यातच जातोय व आमच्या भावना या कर्नाटक सरकारला कळतात; मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना समजत नाहीत. राष्ट्रवादीचे नेते चन्नाप्पान्ना होर्तीकर म्हणाले, की जयंत पाटील हे जलसंपदामंत्री असताना त्यांनी ६ टीएमसी पाणी मंजूर केले आहे; मात्र पाणी येणार, तेवढ्यात सरकार कोसळले आणि कामाला ‘ब्रेक’ बसला.

सध्याच्या सरकारने आमची दखल घेतली नाही व तीन महिन्यांत कामाला सुरुवात केली नाही तर आम्ही कर्नाटकात जायला तयार आहोत. काँग्रेस नेते निवृत्ती शिंदे म्हणाले, की आमदार विक्रम सावंत यांच्या विनंतीनुसार कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील हे ओव्हरफ्लो झालेले पाणी आम्हाला सोडतात. तसेच कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांना मोफत अनुदान दिले जाते. महाराष्ट्राने आमच्या पाण्याची व्यवस्था व सवलती दिल्या नाहीत, तर याचिका दाखल करून जनआंदोलन उभे करू, कर्नाटकात जाऊ.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com