जागतिक अन्न समस्येसह हवामानाची समस्या सोडवणे गरजेचे

दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत नेत्यांचे आवाहन
food crisis
food crisis AGROWON

दावोस (वृत्तसंस्था) ः युक्रेनमधील युद्धामुळे पुरवठा साखळीत (Supply Chain) निर्माण झालेली अनिश्‍चितता, खतांच्या वाढलेल्या किमती (Fertilizer Price) आणि धान्य निर्यातीवरील (Food Export) निर्बंध यामुळे जगभरातील अन्न असुरक्षितता वाढली आहे. जागतिक अन्न संकटासोबतच (Food Crisis) हवामानाच्या संकटाचे (Climate Change) निराकरण करण्याचे आवाहन मंगळवारी (ता. २४) येथे जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत नेत्यांनी केले.

युक्रेनमधील अस्थिरतेमुळे आधीच अनिश्‍चित झालेली जागतिक अन्न सुरक्षा अधिक तीव्र होण्याचा धोका आहे. खतांच्या वाढत्या किमती आणि युक्रेनियन निर्यातीची दुर्गमता यामुळे परिस्थिती नाजूक आणि भयानक बनली आहे, कारण या परिस्थितीत रोज ८०० दशलक्ष लोक रात्रीच्या भोजनापासून वंचित राहतील, असा अंदाज आहे. रशियाकडून युक्रेनियन बंदरांच्या करण्यात आलेल्या नाकेबंदीमुळे जागतिक नेत्यांनी अन्न असुरक्षिततेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक अन्न कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक डेव्हिड बिसले म्हणाले, ‘बंदरे उघडण्यात अयशस्वी होणे म्हणजे जागतिक अन्न सुरक्षेवरील युद्धाची घोषणा आहे.’ सध्याच्या परिस्थितीबाबत ते म्हणाले, की साथीच्या रोगाने दुष्काळ आणि अन्न असुरक्षितता कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नांना आधीच क्लिष्ट केले होते आणि युक्रेनमधील संघर्षामुळे ही आव्हाने आणखी तीव्र झाली आहेत. आम्ही भुकेलेल्यांना देण्यासाठी भुकेल्यांकडून अन्न घेत आहोत.

एका पॅनेल चर्चेत, नेत्यांनी असेही सांगितले, की अन्न असुरक्षितता ही केवळ सार्वजनिक आरोग्याचीच नाही तर भूराजकीय आणि सुरक्षिततेची समस्या आहे. कृषी आणि हवामान बदल यांच्यातील परस्परसंबंध लक्षात घेता, हवामान आणि शाश्‍वतता लक्ष्यांची पूर्तता करण्याच्या खर्चावर अन्नटंचाईचा सामना करण्यासाठी अल्पकालीन प्रयत्न धोकादायक ठरू शकतात.

टांझानियाचे उपाध्यक्ष फिलिप इस्दोर मपॅंगो यांनी खंडातील तरुण लोकसंख्येकडे लक्ष वेधले. अंदाजे ७० टक्के लोकसंख्या २५ किंवा त्यापेक्षा कमी वयाची आहे आणि कृषी उत्पादकता सुधारण्यासाठी तरुणांचा समावेश करण्याची गरज आहे. आपण रणनीती आखली पाहिजे जेणेकरून आपल्याकडे तरुण लोकसंख्या कृषी मूल्य साखळीत सामील होईल.

संयुक्त अरब अमिरातीचे हवामान बदल आणि पर्यावरणमंत्री मरियम महंमद सईद अल म्हेरी म्हणाले, की श्रीमंत आणि विकसनशील अशा दोन्ही राष्ट्रांची भूमिका महत्त्वाची आहे. विशेषत: जगाला पोसण्यासाठी अन्न उत्पादन २०५० पर्यंत ६० टक्क्यांहून अधिक वाढले पाहिजे.

कमी जमिनीवर अधिक अन्न पिकवण्याचे ध्येय आवश्यक

तज्ज्ञांच्या मते, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि पुनरुत्पादक तंत्रामुळे कृषी उत्पादकतेत सुधारणा घडू शकते. हवामानातील बदल आणि अन्न सुरक्षेसाठीच्या उपायांचा शेती हा भाग असणे आवश्यक आहे, असे सिंजेन्टा ग्रुपचे सीईओ जे एरिक फायरवाल्ड यांनी सांगितले. ते म्हणाले, की कमी जमिनीवर अधिक अन्न पिकवणे हे ध्येय असणे आवश्यक आहे आणि असे करण्यासाठी शेतकरी सेंद्रिय आणि पारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या शेतीतून सर्वोत्तम पद्धती वापरू शकतात. काही नेत्यांनी असे मत व्यक्त केले, की जागतिक अन्न सुरक्षा सुधारण्यात आफ्रिका मोठी भूमिका बजावू शकते, परंतु या खंडाला कृषी उत्पादकता अनलॉक करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com