GM Crops : बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांऐवजी सरकारी संशोधन संस्थांनी जीएम पिके विकसित करावीत; नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञाचे मत

भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ वेंकी रामकृष्णन यांनी भारतातील जीएम पिकांविषयी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
GM Crops
GM CropsAgrowon

भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ वेंकी रामकृष्णन (Venky Ramakrishnan) यांनी भारतातील जीएम पिकांविषयी स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

केंद्र सरकार (Central Govt.) आणि कृषी संशोधन संस्थांनी वाढती लोकसंख्या आणि वातावरणातील बदल यामुळे उद्भवणाऱ्या अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडविण्यासाठी जीएम वाण विकसित करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असे ते म्हणाले.

खासगी बहुराष्ट्रीय कंपन्यांऐवजी सरकारी संशोधन संस्थांनी हे संशोधन करावे. देशातील शेतकऱ्यांच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन जीएम वाण (GM Crop) विकसित करावीत, असे ते म्हणाले.  


GM Crops
GM Crops : काय आहेत जीएम पिकांचे फायदे-तोटे?

रामकृष्णन यांनी एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम येथे ३ फेब्रुवारी रोजी `रायबोसोम्स आणि कोव्हिड लस विकसित करण्यात शास्त्रज्ञांचे योगदान` या विषयावर व्याख्यान दिले.

त्यावेळी जीएम तंत्रज्ञानाविषयी एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

लोक जीएम पिकांना विरोध करतात कारण त्यांना असे वाटते की ही पिके बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून विकसित केली जातात आणि त्यामुळे मक्तेदारी आणि त्यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात.

त्यामुळे सरकारने आपल्या अखत्यारित असलेल्या प्रयोगशाळांच्या माध्यमातून जीएम पिके विकसित करावीत, असे ते म्हणाले.

खासगी कंपन्यांचा उद्देश नफेखोरीचा असू शकतो. त्यामुळे त्यांना विशिष्ट गुणधर्म असलेले वाण विकसित करण्यात रस असतो.

याउलट सरकारला मात्र शेतकऱ्यांचे व्यापक हित लक्षात घेऊन संशोधन करणे शक्य असते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

त्याला वेंकी रामकृष्णन यांच्या वक्तव्यामुळे दुजोरा मिळाला आहे.

‘‘जीएम तंत्रज्ञानाचा उपयोग करून दुष्काळप्रतिबंधक तसेच कीड प्रतिकारक वाण विकसित करणे शक्य आहे.

त्यामुळे पिकाचे पोषणमूल्य कायम ठेऊन रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापर कमी करणे शक्य होईल. उदा. जीएम तंत्रज्ञानाचा वापर करून भात आणि भरड धान्यांची अधिक पोषक वाण विकसित करणे श

क्य आहे,`` असे रामकृष्णन म्हणाले.  

GM Crops
GM Crop : पिकांच्या जीएम वाणांची वाटचाल कशी झाली?

भारताची लोकसंख्या वाढतच जाणार आहे. तसेच वातावरणातील बदलाचाही फटका शेतीला बसत आहे.

त्यामुळे येत्या काळात अन्नसुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. मोजक्या बहुराष्ट्रीय कंपन्यांपेक्षा देशातील शास्त्रज्ञ आणि जीएम तंत्रज्ञान हेच या समस्येवरचे उत्तर आहे, असे रामकृष्णन यांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com