Mumbai-Goa Highway : गोवा-मुंबई महामार्गामुळे आता 'हे' संकट; शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका

गोवा-मुंबई महामार्गाच्या विस्तारामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याच्या कडेला असलेली झाडे तोडल्याने प्रवासी थांबत नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या कलिंगडाची विक्री होत नाही, असा आरोप शेतकऱ्यांचा आरोप आहे.
watermelon
watermelon agrowon

Watermelon Farmers in Konkan : अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे (Goa-Mumbai National Highway) विस्तारिकरणाचे काम वेगात सुरू आहे. या महामार्गामुळे वाहतूक जलद होणार असल्याने कोकणवासीयांना (Kokan) नवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सिंधुदुर्गमधील (Sindhudurg) कलिंगड उत्पादकांच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

बिबवणे गावातील शेतकऱ्याला आता महामार्गावर कलिंगड विक्रीतून (watermelon) दिवसाला १ हजार ५०० रुपये मिळताय. जे पूर्वीचे 5,000 रुपये होते.

watermelon
ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध 

बिबवणे हे गाव मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्गातील कुडाळ शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या परिसरातील शेतकरी रस्त्याच्या कडेला कलिंगड विक्रीचा व्यवसाय करतात. अशा प्रकारे उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांपैकी कृष्णकांत गोपाळ पुंडुरकर यांचा समावेश आहे. या परिसरात महामार्गाचे विस्तारीकरण सुरू होण्यापूर्वी तीन दशके कलिंगड विक्रीचा व्यवसाय भरभराटीला आला होता.

पुंडुरकर म्हणाले की, या रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी रस्ता अरुंद होता. दोन्ही बाजूला झाडे होती. गोवा किंवा मुंबईला जाणारे लोक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बिबणे पसिरात कलिंगड खरेदी करण्यासाठी काही काळ थांबायचे. त्यानंतर स्टॉल्सची संख्या वाढू लागली. सध्या या भागात सुमारे 30 स्टॉल्स आहे.

2021-22 मध्ये राष्ट्रीय महामार्गाचा विस्ताराचे काम सुरू झाले. तसे झाडे तोडण्यात आली त्यामुळे पूर्वी झाडांच्या सावलीत थांबणारे लोक आता राष्ट्रीय महामार्गावरून सुसाट धावू लागली आहेत. त्यामुळे पूर्वी ते दररोज सुमारे 5,000 रुपये कमवत असे. सध्या उत्पन्न घटल्याने फक्त 1,500 रुपये मिळत आहेत.

watermelon
watermelon : खानदेशात कलिंगड पीक परवडेना

कलिंगड उत्पादक शेतकरी मुकेश वेंगुर्लेकर यांनी सांगितले की, बिबवणे गावात सुमारे २० हेक्टर जमिनीवर टरबूजाचे पीक घेतले जाते.राष्ट्रीय महामार्गालगत कलिंगडचा व्यापार हा गट शेतीचे उत्तम उदाहरण आहे. कलिंगडच्या शेतात शेतकरी एकत्र येऊन लिलाव करतात. त्यानंतर त्याची रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर विक्री केली जाते. डिसेंबरपासून जूनपर्यंत कलिंगडाचा हंगाम सुरू राहतो. परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठे उत्पन्नाचे साधन होते. महामार्गाच्या विस्तारीकरणानंतर टरबूजांची मागणी कमी झाल्याने व्यवसायाला मोठा फटका बसला आहे

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या ग्राहकांवर अनेक बाजारपेठा अवलंबून होत्या. महामार्गावर बांधलेल्या उड्डाणपुलामुळे ग्राहक मिळत नाहीत. त्यामुळे गावातील बाजारपेठा उद्धस्त झाल्या. त्यामुळे जवळपासच्या गावांवर आर्थिक परिणाम झाला आहे. कलिंगड विक्रीवर झालेला परिणाम हे केवळ एक उदाहरण आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com