कर्मे ईशु भजावा

स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकवून ठेवणे आणि ते सिद्ध करणे यासाठी आपण कायम कृतिशील असले पाहिजे.
कर्मे ईशु भजावा

स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व टिकवून ठेवणे आणि ते सिद्ध करणे यासाठी आपण कायम कृतिशील असले पाहिजे. परीक्षेत यश मिळविण्यासाठी, नोकरीत बढतीसाठी किंवा धंद्यात प्रगतीसाठी प्रत्येकाची अविरत धडपड चालू असते. कोणतेही ध्येय प्राप्त करण्यासाठी कर्म केल्याशिवाय पर्याय नाही.

कर्मे ईशु भजावा
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

ज्यांचा कृतीवर विश्‍वास नाही असे लोक ध्येय प्राप्तीसाठी देवाला साकडे घालतात. नवस बोलतात. ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. देव भोळे लोक अंधश्रद्धाळू तर असतातच शिवाय मी चुकीचे कृत्य केले तरी देव मला साह्य करील अशी त्यांची भाबडी भावना असते. बहुतेक कृतिहीन माणसे देवभोळे असतात. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी त्यांची वृत्ती असते.

निर्मळ वृत्तीने कर्माला ईश्‍वर मानून साध्य झालेली ध्येयप्राप्ती ही ईश्‍वर प्रसन्न झाल्याचे समाधान देते. थोर महात्मे ज्याप्रमाणे सिद्धी प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षे तपश्‍चर्या करीत. आपल्या नोकरी किंवा व्यवसायात निश्‍चित असे ध्येय गाठण्यासाठी मिळवावे लागणारे ज्ञान, करावी लागणारी रोजची प्रामाणिक धावपळ आणि मेहनत त्यातून बनत जाणारी अनुभवाची प्रगल्भता या गोष्टी सुद्धा तपश्‍चर्येपेक्षा कमी कशा म्हणता येतील? अविरतपणे कोणत्याही गोष्टीचा ध्यास घेतला तर ती गोष्ट प्राप्त होतेच शिवाय आपण त्या गोष्टीशी अगदी एकरूप होऊन जातो.

ईश्‍वराचा ध्यास घेतला तर तो प्रसन्न होतो असे महात्मे सांगतात. आपली तपश्‍चर्या म्हणजे विशिष्ट ध्येयाचा ध्यास घेऊन करीत असलेले आपले रोजचे विहित कर्म. जे स्वच्छ आणि निर्मळ वृत्तीने आपण करत असू, तर त्यातून मिळणारी समृद्धी आणि समाधान ही एक प्रकारची ईश्‍वरप्राप्तीच आहे. ‘कर्मे इशू भजावा’ असे ज्ञानेश्‍वर माउलींनी म्हटले आहे.

कर्मे ईशु भजावा
Fodder Crop : पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड | ॲग्रोवन

संत सावता माळी हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी कधीही पंढरपूरला गेले नाहीत. त्यांनी कांदा मुळा भाजी यातच आपली विठाबाई शोधली. त्यांचा हिरव्यागार बहरलेला मळा पांडुरंगाचे रूप घेऊन अवतरला होता. त्यामुळे त्यांना पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घ्यायची गरज वाटली नाही. जेव्हा माझा शेतकरी शेतात अविरत मेहनत करून चांगली मशागत करतो, जमिनीला खत पाणी देतो.

काळ्या आईच्या उबदार कुशीत पेरलेल्या बियांतून जेव्हा कोवळे अंकुर फुटू लागतात. तेव्हा त्यात ईश्‍वराचे रूप प्रकट झालेले असते. शेतकऱ्याचा फळाफुलांनी बहरलेला मळा हे त्याच्या तपश्‍चर्येचे फळ असते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असला तरी कर्माला ईश्‍वर मानून मिळवलेली ध्येयप्राप्ती हीच ईश्‍वरप्राप्ती असते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com