Samruddhi Highway: समृद्धी महामार्गालगत ‘पणन’ उभारणार गोडाऊन

यवतमाळ जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट; बाभूळगाव येथे बांधणार गाळे
Samruddhi Mahamargh
Samruddhi MahamarghAgrowon

यवतमाळ : खासगी बाजारात कापसाचे दर (Cotton Rate) चांगले आहेत. त्यामुळे पणन महासंघाकडे (Panan Mahasangh) येणारी कापसाची आवक घटली आहे. परिणामी, पणन महासंघ आर्थिक अडचणीत सापडला आहे. पणनचे आणखी एक उत्पन्नाचे साधन तयार व्हावे, यासाठी समृद्धी महामार्गालगत पणन महासंघ गोडाऊन उभारण्याच्या तयारीत आहे.

Samruddhi Mahamargh
Crop Insurance : पीकविमा योजने अंतर्गत १३ लाखांवर अर्जाद्वारे नुकसानीची पूर्वसूचना

शिवाय, बाभूळगाव येथे चाळीस गाळे बांधण्याचाही विचार पणन करीत आहे. नुकत्याच झालेल्या पणनच्या आमसभेत या विषयावर चर्चा झाली असून लवकरच पणनचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक जिल्ह्या दौरा करणार आहेत.

Samruddhi Mahamargh
Crop Damage Survey : सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी

एकेकाळी पणनचा डोल्हारा मोठा होता. कापूस खरेदीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल पणन महासंघ करीत होता. परंतु एकाधिकार संपुष्टात आला. त्यासोबतच खासगी बाजारात दरही चढे असल्याने पणनकडे कापूस आवक कमी झाली. त्यामुळे पणन महासंघाच्या अडचणीत वाढ झाली.

त्यावर पर्याय म्हणून समृद्धी महामार्गालगत असलेल्या पणनच्या जागेवर मोठमोठे गोडाऊन तयार करण्याचा विचार पणन संचालकांनी मांडला. आमसभेत या विषयाला मंजुरी मिळाली आहे. या संदर्भात वखार महामंडळासोबत चर्चा झाली. गोडाऊन तयार करून ती वखार महामंडळाला द्यायची, यातून शेतकऱ्यांचा फायदा होईल आणि पणनचाही कारभारही सुरू राहणार आहे.

त्यामुळे धामणगाव, देवगाव तसेच बाभूळगाव या ठिकाणी पणन पायलट प्रोजेक्ट म्हणून गोदाम तयार करण्याच्या विचारात आहे. शिवाय, बाभूळगाव येथे चाळीस दुकाने काढण्याचा विचारही पणन महासंघाचा आहे. जागेची पाहणी करण्यासाठी पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख तसेच व्यवस्थापकीय संचालक लवकरच पाहणी करणार आहे. पणन महासंघाची ही योजना पूर्णत्वास आल्यास शेतकऱ्यांना निश्‍चितच याचा फायदा होणार आहे.

तीन हजार टनाचे गोडाऊन

पणन महासंघाने समृद्धी महामार्गालगत असलेल्या आपल्या मालकीच्या जागेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेवर तीन हजार टनाचे गोडाऊन तयार केले जाणार आहे. टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहून वेगवेगळ्या भागात अशा पद्धतीचे गोडाऊन तयार करण्याचा मानस पणन महासंघाचा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com