स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेडला ‘गोल्डन पीकॉक' अवॉर्ड

चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि विक्री प्रमुख नरेश देशमुख, विक्री विभागाचे पुष्कल उपाध्याय आणि कंपनीच्या दक्षिण विभागाचे मुख्य विक्री व्यवस्थापक प्रभाकर रेड्डी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
Golden peacock
Golden peacockAgrowon

पुणेः महाधन खताचे उत्पादक आणि विक्रेता असणाऱ्या स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीस इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स संस्थेच्या वतीने २०२२ साठीचा 'गोल्डन पीकॉक अवॉर्ड फॉर इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट /सर्विसेस ' नुकतेच प्रदान करण्यात आले.

चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि विक्री प्रमुख नरेश देशमुख, विक्री विभागाचे पुष्कल उपाध्याय आणि कंपनीच्या दक्षिण विभागाचे मुख्य विक्री व्यवस्थापक प्रभाकर रेड्डी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड म्हणजेच महाधन कंपनीने २०१७ मध्ये स्मार्टेक तत्रंज्ञानावर आधारित खते बाजारात आणली. यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्मार्टेक खतांना २०१९ साली ‘गोल्डन पीकॉक' ॲवॉर्ड मिळाले होते.

‘महाधन'ने खतांवरील अवास्तव खर्च कमी होण्यासाठी खताच्या प्रत्येक दाण्यामध्ये त्या पिकाला लागणारी सर्व आवश्यक अन्नद्रव्ये असणारे 'महाधन क्रॉपटेक' खत सादर केले. यामध्ये स्मार्टेक खताप्रमाणे न्यूट्रिएंट अनलॉक तंत्रज्ञान असल्याने हे खत पिकाच्या पोषणाची संपूर्ण काळजी घेते.

क्रॉपटेक हे खत कांदा,ऊस,कापूस, मका आणि भुईमूग पिकासाठी विकसित करण्यात आले आहे. या खतातून नत्र, स्फुरद व पालाश यासोबत मॅग्नेशिअम व गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये, तसेच जस्त, लोह आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित प्रमाणात पुरवठा होतो. या खताच्या वापरामुळे पीक उत्पादनात १० ते १२ टक्के वाढ आणि एकूण अन्नद्रव्य व्यवस्थापन खर्चामध्ये २० टक्के बचत होते,अशी माहिती नरेश देशमुख यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com