Road Accident : रायगडमध्ये वाहतुकीसाठी गोल्डन नियमावली

महामार्गासह शहरांतील मुख्य-अंतर्गत रस्‍त्‍यावरील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी रायगड पोलिसांच्या संकल्पनेतून वाहतुकीचे दहा गोल्डन नियम करण्यात आले आहेत.
Road Accident
Road AccidentAgrowon

अलिबाग ः महामार्गासह (Highway Accident) शहरांतील मुख्य-अंतर्गत रस्‍त्‍यावरील वाहतूक कोंडी (Highway Traffic) रोखण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी (Prevention Of Accident) रायगड पोलिसांच्या संकल्पनेतून वाहतुकीचे दहा गोल्डन नियम करण्यात आले आहेत.

Road Accident
Nashik Bus Fire : बसला लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

रायगड जिल्ह्यातून मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, राज्य महामार्ग जात जातात. याशिवाय महामार्गालगतच्या मुख्य-अंतर्गत रस्‍त्‍यांमुळे तालुका, गावे जोडली गेली आहेत. जिल्ह्यात अनेक प्रकल्प असून सरकारी, खासगी कार्यालये आहेत. शाळा, महाविद्यालये व व्यावसायिक शिक्षण संस्था आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांसह नागरिक, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने वर्दळ असते.

Road Accident
Rain News : अकोलखेड केंद्रावरील पाऊस नोंदींचा अचूक अहवाल मागविला

जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढत असून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातही वाढले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना शिस्त लावण्यासाठी तसेच अपघात रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्या संकल्पनेतून वाहतुकीचे दहा गोल्डन नियम लागू लागण्यात आले आहेत. या नियमांचे पालन केल्यास अपघाताबरोबरच वाहतूक कोंडीही रोखता येईल. अलिबागमध्ये दिवसेंदिवस नागरीकरणाबरोबरच पर्यटकांचा ओघ वाढत आहे.

शहरामध्ये वाहनांची वर्दळ वाढल्‍याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने प्रयत्न सुरू आहेत. अलिबागमध्ये वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांविरोधात जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई केली जाणार आहे. महावीर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बालाजी नाका, मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, बाजारपेठ या परिसरात मोठी वर्दळ असते.

या ठिकाणी वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई केली जाणार आहे. समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही पोलिस तैनात असतील. रात्रीच्या वेळी धूम स्टाईलने तसेच कर्णकर्कश आवाजाने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिली.

वाहतुकीचे गोल्‍डन नियम

दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करावा.

चारचाकी वाहन चालविताना सीटबेल्टचा वापर करावा.

वेगमर्यादेपेक्षा अतिवेगाने वाहन चालवू नये.

मद्य प्राशन करून वाहन चालवू नये.

वाहन चालविताना लेन कटिंग करू नये.

पादचाऱ्यांनी नेहमी पदपथाचा वापर करावा.

वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये.

 रस्त्यावर धोकादायकरीत्या वाहन चालवू नये.

 पादचाऱ्यांनी झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी रस्ता ओलांडावा.

वाहन चालविताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्यावा

वाहन चालविताना गोल्डन नियमांचे पालन केल्यास अपघात व वाहतूक कोंडी रोखता येणार आहे. हे सर्वसामान्य नागरिकांना सहज समजतील, असे नियम आहेत. या नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करावे.
अशोक दुधे, पोलिस अधीक्षक, रायगड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com