SMART : विदर्भातील बाजार समित्या ठरल्या अधिक ‘स्मार्ट’

‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत विदर्भातील बाजार समित्यांचा बोलबाला राहिला.
SMART : विदर्भातील बाजार समित्या ठरल्या अधिक ‘स्मार्ट’

नागपूर : ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत (SMART Project) राज्यातील बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या क्रमवारीत विदर्भातील बाजार समित्यांचा (APMC In Vidarbh) बोलबाला राहिला. गुणानुक्रमानुसार हिंगणघाट बाजार समिती दुसऱ्या, तर कारंजा बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर आहे.

SMART : विदर्भातील बाजार समित्या ठरल्या अधिक ‘स्मार्ट’
SMART Project : शेतकरी कंपन्यांच्या मूल्यसाखळीला ‘स्मार्ट’ चालना

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत राज्यातील बाजार समित्यांची २०२१-२२ या वर्षाची वार्षिक क्रमांक यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मंगरूळपीर पाचव्या, अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार सहाव्या, वाशीम सातव्या, नागपूर जिल्ह्यातील काटोल आठव्या स्थानी, अकोला बाजार समिती ९ तर नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समिती दहाव्या स्थानी आहे.

SMART : विदर्भातील बाजार समित्या ठरल्या अधिक ‘स्मार्ट’
APMC Ranking : ‘रॅंकिंग’मध्ये पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर नाही

गुणानुक्रमानुसार पहिल्या दहा बाजार समित्यांमध्ये विदर्भातील तब्बल आठ बाजार समित्यांचा समावेश आहे. हा एक विक्रम मानला जात आहे. क्रमवारीत ३०५ बाजार समित्या असून दहानंतरदेखील विदर्भातील बाजार समित्या क्रमवारीत कायम आहेत. त्यामध्ये अमरावती, वरोरा, मूर्तिजापूर, शेगाव, सिंदी, नागपूर, मानोरा, दर्यापूर, सावनेर, चंद्रपूर, कळमेश्वर, अहेरी, रिसोड, मेहकर, अंजनगावसुर्जी, अमरावती, आर्णी, यवतमाळ, भिवापूर, नागपूर, वरूड, अमरावती, वर्धा, तेल्हारा, अकोला, यवतमाळ, मौदा, पुसद, चिखली, समुद्रपूर, पुलगाव, नागभीड, नरखेड मांडळ, गोंडपिंपरी, तुमसर, दिग्रस, चांदुर रेल्वे, अर्जुनी मोरगाव, खामगाव, लाखांदूर, मोर्शी, बुलडाणा, उमरखेड, लाखनी, अकोट आदी बाजार समित्यांचा समावेश आहे.

उमरेड बाजार समितीची आघाडी

नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीने जिल्ह्यातून दुसरा, नागपूर महसूल विभागातून तिसरा, तर राज्यातून सातवा क्रमांक प्राप्त केला आहे. शेतमाल विक्री व्यवस्थेसाठी बाजार समित्यांमध्ये असलेल्या पायाभूत सुविधा व इतर सुविधा, आर्थिक कामकाज वैधानिक कामकाज अशा १५ निकषांच्या व दोनशे गुणांच्या आधारे ही निवड करण्यात आली. शेतकरी हिताच्या दृष्टीने अधिकाधिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी बाजार समिती प्रयत्नशील राहील. पुढील वर्षाच्या क्रमवारीत आणखी वरचे स्थान प्राप्त करू, असा विश्‍वास उमरेड बाजार समितीच्या सचिवांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com