Godavari Project : ऊर्ध्व ‘गोदावरी’ला प्रशासकीय मान्यता

पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या सर्व प्रवाही वळण योजनांची अर्धवट कामे तसेच मांजरपाडासह पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण, काँक्रिटीकरण व ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण होणार असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
Godavari Project
Godavari ProjectAgrowon

नाशिक : ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाच्या (Godavari Project) चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता (Government Approval) मंत्रिमंडळांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या सर्व प्रवाही वळण योजनांची अर्धवट कामे तसेच मांजरपाडासह पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण, काँक्रिटीकरण व ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण होणार असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली.

ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाला चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी छगन भुजबळ गेले अनेक दिवस पाठपुरावा करत होते. याबाबत नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे या विषयावर विधानसभेत चर्चा घडवून आणली होती. त्या वेळी लक्षवेधीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिनाभरात या प्रकल्पाला मान्यता दिली जाईल, असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार आश्वासन पूर्ण झाले आहे.पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या मांजरपाडा (देवसाने) या पथदर्शी योजनेसह इतर सर्व प्रवाही वळण योजना, पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा, ओझरखेड डावा कालव्याचा समावेश ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पामध्ये होतो. या प्रकल्पामधील मांजरपाडासह काही वळण योजना आणि कालव्यांची कामे निधीअभावी अपूर्ण अवस्थेत आहेत. या प्रकल्प अहवालास मिळावी यासाठी भुजबळांचे प्रयत्न होते.

जयंत पाटील हे जलसंपदामंत्री असताना यासाठी त्यांनी मंत्रालयात बैठकसुद्धा घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून सोमवारी (ता. १२) मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेच्या चतुर्थ अहवालाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्रकल्पाचा प्रस्ताव मार्च-२०२१ मध्ये राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीकडून शासनास सादर झाला होता. या प्रस्तावावर २४ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या व्यय्य अग्रक्रम समिती बैठकीत चर्चा होऊन हा विषय राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णयसुद्धा झाला होता.

मंजुरी मिळाल्याने कालव्यांची अपूर्ण कामे लागणार मार्गी लागणार आहेत. त्यामुळे कालव्यांच्या गळतीचे प्रश्न मार्गी लागून पाणी डोंगरगावपर्यंत पोहोचून येवलेकरांची स्वप्नपूर्ती होणार आहे. दिंडोरी, निफाड, चांदवड, येवला तालुक्यांना फायदा प्रलंबित सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाअंतर्गतची दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा (देवसाने), धोंडाळपाडा, ननाशी, गोळशी महाजे यासह पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवणाऱ्या सर्व प्रवाही वळण योजनांची अर्धवट कामे पूर्ण होणार आहेत.

त्याचप्रमाणे पुणेगाव-दरसवाडी, दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण व काँक्रिटीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे मार्गी लागण्यासाठी प्रकल्पाला मान्यता मिळणे अत्यंत आवश्यक होते. या प्रकल्पांची अपुरी कामे पूर्ण झाल्यावर प्रामुख्याने दिंडोरी, निफाड, चांदवड आणि येवला या तालुक्यांतील जलसिंचनाला फायदा होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com