
Konkan Folk Art in Ratnagiri : कोकणात लोककलेची समृद्ध परंपरा आहे. यासाठीच कोकण लोककला महामंडळ (Konkan Folk Art Board) स्थापन करण्यास शासन सकारात्मक आहे. लोककला महोत्सवामुळे (Folk Art Festival) आर्थिक विकासाला चालना मिळेल.
गेल्या सहा महिन्यांत या शासनाने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले, असे प्रतिपादन प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटन वाढीस चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
चिपळूण येथील श्रीजुना कालभैरव मैदानावर ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान पर्यटन, लोककला, सांस्कृतिक, खाद्य महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार योगेश कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, लोककलावंत प्रभाकर मोरे, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यात आतापर्यंत होऊन गेलेल्या रत्नांचे लोककला प्रदर्शनात लावलेल्या तैलचित्रांचे अनावरण करण्यात आले. या तैलचित्रांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राचा समावेश करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, की की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण भूमीतील गडकिल्ले, सागरी किनारे, निसर्गसंपन्न वातावरण हे कोकणचे वैभव आहे. मुंबई ते गोवा जुना महामार्ग देखील वेगाने तयार होत आहे.
कोकणची वैशिष्ट्ये अधोरेखित करणाऱ्या पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सव आयोजित केले आहे. उर्वरित महाराष्ट्राला, किंबहुना भारताला कोकणचा सर्वांगीण परिचय व्हावा, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे.
अस्सल लोककलेची मिळणार मेजवाणी
चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कोकणाच्या मातीतील अनेक अस्सल लोककला सादर केल्या जाणार आहेत.
सिंधुदुर्गातील दशावतार/चित्रकथी, जिल्ह्यातील नमन, जाखडी, काटखेळ, गजो, संकासूर रायगड जिल्ह्यातील कोळी नृत्य, ठाणे जिल्ह्यातील तारपा नृत्य अशा ४० पेक्षा अधिक लोककला त्यांच्या मूळ रूपात सादर केल्या जाणार आहेत.
दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लोककलांचे सादरीकरण होणार आहे. दररोज सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत खुला लोककला कट्टा स्थानिक कलाकारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
याशिवाय संदर्भपूर्ण माहिती देणारे परिसंवाद दिवसभरात होणार आहेत. कोकणी पदार्थांच्या वैशिष्ट्यपूर्ण चवींचे ३० पेक्षा अधिक स्टॉल्स असणारी खाऊगल्ली ही चोखंदळ खवय्यांसाठी पर्वणीच आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.