Deepak Kesarkar : शासकीय यंत्रणांनी गतीने कामे पूर्ण करावीत

सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा नियोजन समितीमधून प्राप्त झालेल्या निधी अंतर्गतची सर्व कामे अधिक गतीने पूर्ण करावीत. मंजूर असलेला निधी शिल्लक राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी,’’ असे निर्देश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
Deepak Kesarkar : शासकीय यंत्रणांनी गतीने कामे पूर्ण करावीत

कोल्हापूर : ‘‘सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा नियोजन समितीमधून प्राप्त झालेल्या निधी अंतर्गतची सर्व कामे (Government Work) अधिक गतीने पूर्ण करावीत. मंजूर असलेला निधी शिल्लक राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी,’’ असे निर्देश पालकमंत्री दीपक केसरकर (Deeepak Kesarkar) यांनी दिले.

Deepak Kesarkar : शासकीय यंत्रणांनी गतीने कामे पूर्ण करावीत
Sharad Pawar : राहुल गांधींच्या यात्रेमुळे विरोधी पक्षांमध्ये एकवाक्यता होण्यास मदत

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात आयोजित जिल्हा वार्षिक योजना व कोल्हापूर पर्यटन विकास कामांच्या आढावा प्रसंगी पालकमंत्री केसरकर बोलत होते.

या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, ‘‘जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ अंतर्गत सर्व शासकीय यंत्रणांना प्राप्त झालेला निधी मार्च २०२३ अखेर मंजूर कामावर खर्च झाला पाहिजे. त्यासाठी सर्व कामे अधिक गतीने पूर्ण करावीत. निधी शिल्लक राहणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करावे.’’

Deepak Kesarkar : शासकीय यंत्रणांनी गतीने कामे पूर्ण करावीत
Eknath Shinde : ‘पंदेकृवि’ तील कृषी प्रदर्शनाचे आज मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

‘‘कोल्हापूर पर्यटन विकास कामांतर्गत सर्व संबंधित विभागाने दिलेल्या सूचनांप्रमाणे कामे करावीत. महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत पार्किंगचे काम संथ गतीने सुरु आहे. ते काम अधिक गतीने पूर्ण करावे. ज्या कामांना निधी प्राप्त आहे, ती कामे प्रथम पूर्ण करून मग अन्य कामांना सुरुवात करावी,’’ असे निर्देश केसरकर यांनी दिले.

केसरकर यांनी महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा व परिसर विकास करणे, पंचगंगा नदीकाठ संवर्धन व विकास करणे, शिवाजी पुलाचा पर्यटन विकास, शाहू मिल परिसर विकास आराखडा, जुना राजवाडा संवर्धन व विकास कामे, कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळांना जोडणारा हेरिटेज पथ तयार करणे, वन क्षेत्रातील प्रलंबित विकास कामे आदी बाबींअंतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com