Godavari River : अविरल गोदावरीसाठी शासन आणि समाज एकत्र

अविरल गोदावरी, स्वच्छ, सुंदर व बारमाही वाहण्यासाठी आता शासन व समाज एकत्र आले असून हे कार्य मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.
Godavari River
Godavari RiverAgrowon

नाशिक : अविरल गोदावरी, स्वच्छ, सुंदर व बारमाही वाहण्यासाठी आता शासन व समाज एकत्र आले असून हे कार्य मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला. त्र्यंबकेश्र्वर शहरातील गंगाद्वार येथून ‘चला जाणूया नदीला’ उपक्रमाअंतर्गत अमृत महोत्सवी नदी यात्रेची सुरुवात करण्यात आली.

Godavari River
Godavari Flood : ‘गोदावरी’ला आला पूर

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे लोकायुक्त व माजी न्यायमूर्ती अंबादास जोशी, नमामि गोदा फाउंडेशनचे सदस्य व उपक्रमाचे ब्रँड अंबेसिडर अभिनेते चिन्मय उदगीरकर, ‘नदीला जाणूया’ उपक्रमाच्या राज्य समितीचे अशासकीय सदस्य राजेश पंडित, जिल्हा परिषदेच्या

Godavari River
Godavari Project : ऊर्ध्व ‘गोदावरी’ला प्रशासकीय मान्यता

उप मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा

फडोळ, जलबिरादरीचे विनोद बोधनकर, नरेंद्र चुग, स्मार्ट सिटीचे पी. बर्डे, गणेश भोळे, सरपंच जगन झोले, वन अधिकारी गणेशराव झोले, सत्संग फाउंडेशनच्या एम. वसुकी आदी उपस्थित होते.

गोदावरी व तिच्या उपनद्या स्वच्छ, सुंदर व प्रदूषणविरहीत कशा राहतील याबाबत माहिती व सूचना केल्या. तसेच शासनाच्या वतीने आलेल्या अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या सुरू असलेल्या विविध योजनांबद्दल माहिती देत पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांबद्दल जनजागृती केली.

Godavari River
Agriculture : शेतीचे प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले

या वेळी गोदावरीच्या उपनद्यांवर काम करणाऱ्या गोदासेवकांना कलश देऊन यात्रेची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील नंदिनी, वालदेवी, कपिला, वरुणा, मोती, अगस्ती, माळुंगी या नद्यांवर काम करणाऱ्या गोदासेवकांच्या हाती कलश सुपूर्द करण्यात आला. सूत्रसंचालन अभिनेते किरण भालेराव यांनी केले. कार्यक्रमासाठी धीरज बच्छाव, राहुल रायकर, सुनील मेंढेकर, मनोज साठे, नितीन हिंगमिरे, उदय थोरात यांनी प्रयत्न केले.

‘चला नदीला जाणूया’ उपक्रमाचे उद्दिष्ट

तब्बल ९० नद्या प्रवाहित करणार, एक लाख स्वदेशी वृक्ष लागवड, नागरिकांची जनजागृती, बंधारे बांधणे, भूजल पातळी वाढविणे, वनसंरक्षण करणे आणि नदीचे प्रदूषण थांबविणे, गावकरी व ब्लॉगर्स, ग्रुप सत्संग फाउंडेशन तसेच उपस्थित सर्व शासकीय अधिकारी सर्व उपनद्यांचे प्रतिनिधी आदी सर्वांनी मिळून बंधारा बांधला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com